घरमुंबईUddhav Thackeray : गद्दारांच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : गद्दारांच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार- उद्धव ठाकरे

Subscribe

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी ज्यावेळी शिवछत्रपती महाराजांच्या मूर्तींसमोर उभा राहिलो एक क्षणभर मला असं वाटलं की, ते मला विचारतायेत की, तुम्ही आमचा नुसता जयजयकार करता. पण आमच्याकडून काही शिकलास की नाही? की, नुसता जयजयकार करतोस. छत्रपती शिवाजी महाराजांचा तो जो काळ होता पुन्हा त्याचं काही वर्णन करण्याची गरज नाही.

मालवण (सिंधुदुर्ग) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण दौऱ्यावर असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालवणमधून मोठं व्यक्त केलं आहे. गद्दारांच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुख्यमंत्री करणार असल्याचे ते म्हणाले. तर यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. (Uddhav Thackeray Shiv Sena will be the Chief Minister of the traitors Uddhav Thackeray)

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी ज्यावेळी छत्रपती महाराजांच्या मूर्तींसमोर उभा राहिलो, एक क्षणभर मला असं वाटलं की, ते मला विचारतायेत की, तुम्ही आमचा नुसता जयजयकार करता. पण आमच्याकडून काही शिकले की नाही? की, नुसता जयजयकार करतोस. छत्रपती शिवाजी महाराजांचा तो जो काळ होता त्याचं काही वर्णन करण्याची गरज नाही. अठरापगड जाती, जमातीमध्ये विखुरला गेलेला सगळा आपला हा मराठी माणूस. त्याची ताकद ती काय असणार? शस्त्र नव्हती काहीही नव्हती, समोर बलाढ्य शत्रू होता. त्या मूठभर मावळ्यानिशी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहणं हे केवढं मोठं धाडस होतं. औरंगजेब बसला होता तिकडे दिल्लीत, अफजलखान महाराष्ट्रात आला होता. पण निष्ठा आणि निष्ठावंत माणसं ही मूठभर जरी असली त्याची वज्रमूठ एवढी असते की, आगऱ्याचं तख्त सुद्धा फोडलं होतं. त्या आगऱ्याच्या तख्ताखाली सुद्धा आग लागली होती.

- Advertisement -

आता तर निवडणूका आहेत. त्यावेळेला निवडणूका नव्हत्या. अफजल खान भेटीला आला होता तेव्हा काय EVM नव्हती. आणि त्यांनी जी मगर मिठी मारली आणि पाठीत त्यांनी जो वार केला. जर लेच्यापेच्या सारखा मी गेलो असतो तर काय झालं असतं? शत्रूसमोर कितीही बलाढ्य असू दे, तयारीनिशी गेला आणि मनाची जिद्द असेल तर विजय आपलाच असतो, भवानी तलवार पेलायला मनगट पाहिजे, पण तलवार चालविण्यासाठी खंबीर मन पाहिजे ते खंबीर मन तुझ्याकडे आहे की नाही? असं मला छत्रपती शिवाजी महाराज विचारयेत असं वाटत होतं असे यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शत्रू आगऱ्यावरून येत होते. आता दिल्लीवरुन येतात. त्यांना महाराष्ट्राचं पाणी काय असतं? हे पाजायची लायकी नसली तरी दाखवण्याची गरज आहे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

- Advertisement -

हेही वाचा : Indian Traitor : आपलाच माणूस निघाला गद्दार, परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने केला मोठा गुन्हा

पुढे बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराजांपासून काही जण काहीच शिकले नाहीत. महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. त्या महाराजांचा महाराष्ट्र लुटणारे महाराजांचा पुतळा स्थापन करून गेले. मला एका गोष्टीचा अभिमान नक्की आहे की, यावेळी नौदल दिन सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केला. ज्या आरमाराची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली तेव्हा संपूर्ण देशात आरमार कुठेही नव्हता, त्याची आठवण म्हणून प्रधानमंत्री इकडे आले त्यांनी पुतळ्याचा तिकडे बसवला. मात्र आल्यानंतर मंदिरात जाऊन आशीर्वाद घ्यायचं ते विसरले. असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जर महाराज नसते तर आपला जन्म तरी झाला असता का? आपण राहिलो तरी असतो का? आणि ते राम मंदिर तरी होऊ शकलं असतं का? मग महाराजांना आम्ही देणारे कोण आहोत? असे प्रश्न विचारत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला.

हेही वाचा : Deep Cleaning Drive : स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, पालकमंत्री मंगलप्रभात लोढांचे आवाहन

ज्या गद्दारांनी हे चांगलं चालणारं आणि कारभार करणारं सरकार पाडलं ते कारभार करण्यासाठी नाही पाडलं महाराष्ट्र गिळाला आणि महाराष्ट्र लुटणाऱ्यांना मदत करण्यासाठी पाडलं. आणि पंतप्रधानसुद्धा येथे आले परंतु संकटात ते कधीच आले नाहीत. जेव्हा वादळ आलं होतं तेव्हाही आले नव्हते. कुठेच आले नव्हते. अचानक त्यांना आठवण झाली की, अरे छत्रपती शिवाजी महाराज नावाची एक मोठी व्यक्ती आपल्या देशात होऊन गेली. आणि त्यांनी आरमाराची स्थापना केली. मग हा सिंधुदुर्ग जो मतदारसंघ आहे तो जिंकायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं काहीतरी केलं तर मतं देऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही भक्त एवढे लेचेपेचे नाही आहोत. आम्हाला तुमचे ढोंग समजते. आमच्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत अंगामध्ये आमचा भगवा आहे तुमच्या दिखाव्याला आम्ही भुलणार नाही असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याचा समाचार घेतला.

लाल किल्ल्यावरही भगवा फडकविणार

मुख्यमंत्री होण्याचं माझं स्वप्न नव्हतं, पण ज्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं, मी त्यांच्या नाकावर टिच्चून पुन्हा माझ्या शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणार म्हणजे दाखवणारच. आणि एवढंच नाही तर आता येणारी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून भाजपला दाखवणार आहे की, तुम्ही ज्या भगव्यामध्ये छेद करण्याचं पाप केलं, ज्या भगव्याला तुम्ही डाग लावण्याच काम केलं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा भगवा काय असतो तो लाल किल्ल्यावर पुन्हा फडकून दाखवतो असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -