घरताज्या घडामोडीलटकेंना राजीनाम्याच्या जंजाळात अडकवून महाडेश्वरांना उमेदवारी देण्याचा परबांचा डाव, मनसेचा गंभीर आरोप

लटकेंना राजीनाम्याच्या जंजाळात अडकवून महाडेश्वरांना उमेदवारी देण्याचा परबांचा डाव, मनसेचा गंभीर आरोप

Subscribe

अंधेरी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतरही शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून अद्यापही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. दिवंगत रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात येणार आहे. मात्र, मुंबई महापालिका प्रशासनाने त्यांचा राजीनामा अद्यापही मंजूर केला नाही. त्यामुळे याबाबतचा निर्णय आता मुंबई उच्च न्यायालयात होत आहे.  दरम्यान, मनसेचे कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

मुळात लटकेताईंना राजीनाम्याच्या जंजाळात अडकऊन अंधेरीची उमेदवारी विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अनिल परब यांचा डाव, लटके वहिनींनी ओळखावा इतकच, असं ट्वीट मनोज चव्हाण यांनी केलं आहे.

- Advertisement -

आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने अंधेरी पूर्व विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या ठिकाणी आता पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्याने या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शिंदे गटाने केलेल्या खेळीमुळे ठाकरे गट चांगलाच अडचणीत आला आहे.

- Advertisement -

रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, त्या मुंबई पालिकेच्या कर्मचारी असल्याने त्यांना महिनाभर आधी राजीनामा देणे बंधनकारक आहे. आता यावरूनच कलगीतुरा रंगलेला आहे. ऋतुजा यांनी 2 सप्टेंबर रोजीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण राजीनामा पत्रात त्रुटी असल्याचं सांगण्यात आलं. आयुक्तांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. आज या याचिकेवर सुनावणी झाली.


हेही वाचा : ऋतुजा लटकेंना न्यायालयाचा दिलासा, राजीनामा मंजूर करण्याचे आदेश


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -