घरदेश-विदेशपरमबीर सिंह राहताहेत मुंबईपासून दूर, कारण आले समोर

परमबीर सिंह राहताहेत मुंबईपासून दूर, कारण आले समोर

Subscribe

परमबीर सिंह हे ५ मे पासून सुट्टीवर गेल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ते सुट्टीवर असल्याची माहिती समोर आली आहे. या कालावधीत गृहरक्षक दलाच्या डीजी पदाचा चार्ज हा दुसऱ्या एका आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपावला आहे. गृहरक्षक दलाच्या डिजी पदाचा चार्ज परमबीर हे सुट्टीवर असल्याने आयपीएस के व्यंकटेशम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. परमबीर सिंह यांची तब्येत सद्यस्थितीला ठिक नसल्यानेच ते रजेवर गेल्याची सूत्रांची माहिती आहे. परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात लिहिलेल्या लेटरबॉम्बचे पडसाद हे गेल्या काही दिवसांमध्ये दिसून आले आहेत. त्यामध्ये ईडीच्या धाडींपासून ते अनिल देशमुख यांची ईडी कार्यालयातून समन्स मिळेपर्यंतच्या अनेक घडामोडी गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या आहेत. लेटर बॉम्बच्या माध्यमातून परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री १०० कोटी रूपयांचा आरोप केला होता.

परमबीर सिंह यांच्यावरही अॅट्रोसिटीसह अनेक कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण मिळालेले असले तरीही येत्या काळात त्यांच्या अडचणीच भर पडण्याची शक्यता आहे. येत्या काळात परमबीर सिंह हेदेखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. पण सध्या परमबीर सिंह यांची तब्येत ठीक नसल्यानेच ते चंदीगढला गेल्याची माहिती समोर आली आहे. चंदीगढ येथील एका स्थानिक रूग्णालयाने दिलेल्या प्रमाणपत्रातून ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे एकीकडे अनिल देशमुख यांच्यामागे ईडीचा फेरा लागल्याचे चित्र असतानाच दुसरीकडे मात्र परमबीर सिंह यांचा मुक्काम महाराष्ट्राबाहेर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

राज्य गृहरक्षक दलाचे पोलीस महासंचालक परमबीर सिंग हे २ महिन्याच्या दीर्घ रजेवर गेले असून या विभागाचा अतिरिक्त कार्यभार जेष्ठ आयपीएस अधिकारी के. व्यकटेशन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. परमबीर सिंग यांचे अचानक दोन महिन्याच्या रजेवर गेल्यामुळे पोलीस दलात चर्चेला उधाण आले आहे.

एंटालिया येथील स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणानंतर मुंबईत पोलीस आयुक्तपदावरून राज्य गृहरक्षक दलाचे पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आल्यानंतर परमबीर सिंग हे वादाच्या भोवाऱ्यात अडकले होते. त्यानंतर त्यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा लेटरबॉम्ब फोडून राजकीय वर्तुळात खांबाला उडवून दिली होती. या सर्व प्रकणानंतर राजकारण ढवळून निघाले आणि अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर मात्र परमबीर सिंग यांना एकामागून एक येणाऱ्या अडचणीना सामोरे जावे लागले आहे. सिंग यांच्यावर पोलीस दलातील अधिकाऱ्याच्या तक्रारीचा पाऊस सुरु झाला होता. मुंबई आणि अकोला पोलीस दलातील दोन पोलीस अधिकाऱ्यानी केलेल्या तक्रारीनंतर अकोला येथील भीमराव घाडगे या अधिकाऱयांच्या तक्रारीवरून परमबीर सिंग यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात परमबीर सिंग यांना सध्याच्या घडीला अटकेपासून दिलासा मिळाला असला तरी यांच्यावरील अटकेची तलवार कायम लटकत राहणार असल्याचे समजते.

- Advertisement -

सूत्राच्या माहितीनुसार राज्य गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग हे मागील ५ मे पासून २ महिन्याच्या सुट्टीवर गेले आहे, त्यांनी आजराचे कारण देऊन दोन महिन्याची मोठी रजा घेतली असल्याची माहिती समोर येत आहे, सध्या राज्य गृहरक्षक दलाचा अतिरिक्त कार्यभार जेष्ठ आईपीएस अधिकारी के. व्यकटेशन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. परमबीर सिंग हे चंदीगड येथे असल्याची माहिती समोर येत आहे, तसेच तेथील एका खाजगी रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या वैधकीय अहवालावरून परमबीर सिंग याची प्रकृती ठीक नसल्याची समजते अशी विश्वसनीय सूत्रांनी दिलेली माहिती आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -