घरताज्या घडामोडीPawar vs Pawar : लोकनेता होणं सोपं नसतं...; रोहित पवारांची अजितदादांवर टीका

Pawar vs Pawar : लोकनेता होणं सोपं नसतं…; रोहित पवारांची अजितदादांवर टीका

Subscribe

लोकनेता होणं सोपं नसतं, त्याला 50 ते 60 वर्ष द्यावी लागतात. लोकामध्ये जाऊन त्यांच्यासाठी लढावं लागतं. लोकांचा विश्वास जिंकावा लागतो, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

लोकनेता होणं सोपं नसतं, त्याला 50 ते 60 वर्षे द्यावी लागतात. लोकामध्ये जाऊन त्यांच्यासाठी लढावं लागतं. लोकांचा विश्वास जिंकावा लागतो, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. (pawar vs pawar sharad pawar ncp party mla rohit pawar slams dcm ajit pawar)

महायुतीच्या सरकारने बारामतीतील महारोजगार मेळाव्याचे आजोजन केले होते. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. विशेष म्हणजे एकाच कार्यक्रमात शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. विशेष म्हणजे या महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी भाष्यही केले. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पावर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महायुतीच्या सरकारवर निशाणा साधला.

- Advertisement -

“महारोजगार मेळाव्याच्या मंचावर शरद पवार भाषणासाठी येत असताना युवा वर्गाकडून विशेषत: विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून शरद पवार यांना मोठा प्रतिसाद मिळात होता. शरद पवार यांच्या नावाच्या घोषणा होत होत्या. याचाच अर्थ लोकनेता होणं सोपं नसतं, त्याला 50 ते 60 वर्षे द्यावी लागतात. लोकामध्ये जाऊन त्यांच्यासाठी लढावं लागतं. लोकांचा विश्वास जिंकावा लागतो. त्यामुळेच या महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात शरद पवार यांना मोठा प्रतिसाद मिळाला. याच कारणामुळे आम्ही शरद पवारांसोबत आहोत”, असे म्हणत रोहित पवारांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली.

याशिवाय, “महारोजगार मेळाव्याबाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये ज्यापद्धतीने इनव्हेस्टमेंट्स यायला पाहिजेत, त्या पद्धतीने नवीन इनव्हेस्टमेंट्स येत नाहीत. अनेक कंपन्या महाराष्ट्रातून इतर राज्यात स्थलांतर होत आहे. त्यामुळे कंपन्यांच येणार नसतील आणि आहे त्या कंपन्या राज्याबाहेक जाणार असतील तर, मुलांना आपण कामं कुठे देणार आहोत? ट्रेनी म्हणून त्यांना काम देणार आहात? की पर्मनंट काम त्यांना दिलं जाणार? असे सवाल उपस्थि होत आहेत. त्यामुळे एकिकडे या मेळाव्यांचे स्वागत केलेच पाहिजे पण दुसरीकडे महाराष्ट्रातून गुजरातला गेले प्रोजेक्ट हे परत आणावे लागतील. तसेच, ओडीसा सारख्या छोट्या राज्यांत मोठ्या प्रमाणात इनव्हेस्टमेंट्स तिथं आहेत. तशाप्रकारच्या इनव्हेस्टमेंट्स महाराष्ट्रातसुद्धा यायला पाहिजेत. त्याचवेळी युवा वर्गाला चांगलं काम देता येईल”, असे म्हणत महायुतीच्या सरकारला सल्ला दिला.

- Advertisement -

हेही वाचा – RAHUL GANDHI : इंडिया आघाडीचे सरकार आल्यास तरुणांना काय फायदा? राहुल गांधी म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -