घरताज्या घडामोडीHanuman Chalisa: शिवसेना भवनासमोर मनसेकडून भोंगा लावून हनुमान चालीसा पठण; यशवंत किल्लेदारांसह...

Hanuman Chalisa: शिवसेना भवनासमोर मनसेकडून भोंगा लावून हनुमान चालीसा पठण; यशवंत किल्लेदारांसह मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

मशिदीवरील भोंग्यांविरोधात पुन्हा एकदा मनसे आक्रमक झाल्याचे दिसत आहे. थेट आता शिवसेना भवनासमोर मनसैनिकांकडून भोंगा लावून हनुमान चालीसा पठण करण्यात आले. रामनवमीचे औचित्य साधून सेनाभवनाच्या समोर भोंगा लावून मनसेकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला गेला. हिंदुत्व विसरलेल्या शिवसेनेला जाग आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे मनसेचे नेते यशवंत किल्लेदार म्हणाले. पण काही वेळातच पोलिसांनी मनसेकडून लावण्यात आलेला भोंगा जप्त करून यशवंत किल्लेदारांसह मनसैनिकांना ताब्यात घेतले.

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जिथे मशिदींवर भोंगे लावून अजान सुरू असेल तिथे दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच घाटकोपर येथे मनसेच्या कार्यालयावर भोंगे लावून हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले होते. पण पोलिसांनी काही वेळातच मनसेच्या कार्यालयावरील लावण्यात आलेले भोंगे काढून मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली होती. त्यानंतर आज रामनवमीच्या निमित्ताने मनसेकडून चक्क शिवसेना भवनासमोरच हनुमान चालीस लावली गेली. एका टॅक्सवजा रथावर भोंगा लावून हनुमान चालीसा लावण्यात आली. ज्या मंदिर, मंडळाला मनसेचा हा रथ हवा असेल तिथे तिथे तो फिरवला जाणार असल्याचे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले होते. पण ज्याप्रमाणे घाटकोपरमध्ये घडले त्यानंतर आज दादर येथेही घडले. शिवसेना भवनसमोर हनुमान चालीसाचे पठण केल्यानंतर मनसेकडून लावण्यात आलेला भोंगा पोलीसांनी काही वेळातच जप्त केला आणि यशवंत किल्लेदारांसह मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

‘शिवसेनेने हिंदुत्व सोडून सत्तेसाठी लाचरी पत्करली’

‘आज रामनवमीचा सण आहे. राज ठाकरेंनी आम्हाला सगळे सण मोठ्या प्रमाणात साजरे व्हायला पाहिजेत असे सांगितले आहे. विविध ठिकाणी आज रामनवमीचा उत्सव साजरा होत आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हा रथ तयार केलेला आहे. ज्या मंडळांकडून किंवा मंदिरांकडून या रथासाठी मागणी होईल, त्या ठिकाणी आम्ही पाठवू. दरम्यान शिवसेनेने हिंदुत्व बासनात गुंडाळून ठेवले आहे. हिंदुत्व सोडून सत्तेसाठी लाचरी पत्करली आहे. त्यांना याची जाग यावी, यासाठी शिवसेना भवनासमोर भोंगा लावला आहे,’ असे यशवंत किल्लेदार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – शिवतीर्थावर राज ठाकरे- रावसाहेब दानवेंची भेट, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -