घरमहाराष्ट्रPolitics : सांगलीच्या जागेवरून आघाडीत धुसफूस; काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा

Politics : सांगलीच्या जागेवरून आघाडीत धुसफूस; काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा

Subscribe

मुंबई : महाविकास आघाडीतील जागावाटप रखडलेले असताना सोमवारी सांगली लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातील धुसफूस समोर आली. सांगलीच्या जागेवर आघाडीतील दोन्ही पक्षांनी दावा केल्याने जागावाटपाचा पेच कायम असून कार्यकर्ते संभ्रमात आहेत. (Politics Dhusfus in front from Sangli seat Congress and Thackeray group claim)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारीला काँग्रेसचे सांगली जिल्ह्यातील नेते विश्वजित कदम यांनी आक्षेप घेतला आहे. सांगलीमधून विशाल पाटील हे काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे सांगलीवरून महायुतीतील मतभेद समोर आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Electoral Bond : महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्षाला मिळाले नाही निवडणूक रोखे

दरम्यान, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचाच आहे. कोल्हापूरमधून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे निवडणूक लढवत असल्याने महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसला देण्यात आला आहे. त्याबदल्यात शिवसेनेने सांगलीची जागा घेतली आहे, असे सांगत येत्या दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन जागावाटपासंदर्भात घोषणा केली जाईल, अशी माहिती उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज दिली.

- Advertisement -

महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात शनिवारी नेहरू सेंटरमध्ये बैठक घेण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांचे नेतेमंडळी उपस्थित होते. या बैठकीत जागावाटपाची अंतिम चर्चा झाली आहे, असे राऊत यांनी  सांगितले. सांगलीच्या जागेसंर्भात राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, रामटेकची जागा आणि कोल्हापूरची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. कोल्हापूरमधून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे निवडणूक लढणार असल्याने ती जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेने घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली असून त्यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे जाणार आहेत.

हेही वाचा – Eknath Shinde : राज ठाकरेंचा महायुतीत सहभाग? मुख्यमंत्री म्हणतात, योग्यवेळी योग्य निर्णय…

सांगलीला लागूनच हातकणंगले हा लोकसभा मतदारसंघ आहे. ती जागा शिवसेनेकडे आहे. हातकणंगलेमधून राजू शेट्टी हे महाविकास आघाडीत सहभागी न होता स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहेत. त्यासाठी या मतदारसंघातून शिवसेनेने आपल्याला पाठिंबा मिळावा द्यावा म्हणून दोन दिवसांपूर्वी शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. या जागेसंदर्भात आमची शेट्टी यांच्याशी बोलणी सुरू आहे. लवकरच याबाबत आम्ही निर्णय घेऊ, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी भावी पंतप्रधान

राहुल गांधी देशातील लोकप्रिय नेते आहेत. राहुल गांधींकडे देश भावी पंतप्रधान म्हणून पाहतो आहे. पंतप्रधान म्हणून राहुल गांधींना पसंती आहे. लोकांची ती भूमिका आहे. राहुल गांधी परखडपणे भूमिका मांडतात. ते झुकत नाहीत, हुकूमशाहीपुढे नमत नाहीत. त्यांचा हा बाणा देशातल्या लोकांना आवडतो, असे सांगत राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपा हा दुसऱ्यांची पोरं पळवून मोठा झालेला पक्ष आहे. त्यांना स्वतःची पोरं नाहीत. सर्व फोडलेली पोरं घेऊन ते बसले आहेत. स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवा, दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे हलवू नका ते पुन्हा पळून जातील, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -