घरमहाराष्ट्रPolitics : शिंदेंच्या 'त्या' दाव्यावर राऊत म्हणतात, बाळासाहेबांनी त्यांचा कडेलोट केला असता

Politics : शिंदेंच्या ‘त्या’ दाव्यावर राऊत म्हणतात, बाळासाहेबांनी त्यांचा कडेलोट केला असता

Subscribe

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांवर आरोप करत असतात. अशातच एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर दोन्ही गट आणखीनच आक्रमक झाले आहेत. अशातच कोल्हापुरामधील जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केला की, उद्धव ठाकरे यांची अमित शाह यांच्यासोबत बाळासाहेबांच्या बंद खोलीत चर्चा झालीच नाही. या दाव्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Maharashtra Politics On Eknath Shinde that claim Sanjay Raut says Balasaheb Thackeray would have rejected him)

हेही वाचा – Baramati : हर्षवर्धन पाटील यांच्या दोन्ही मुलांकडून इशारा; बारामतीत अजित पवार-पाटील संघर्ष पेटणार?

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, भाजपा आणि शिवसेना युती 2014 निवडणुकीत तुटली. त्यानंतर भाजपाला प्रचंड धक्का बसला. आपण जिंकू शकत नाही, हे त्यांना समजले. त्यामुळे भाजपचे अध्यक्ष असलेले अमित शाह स्वतः मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले होते? हा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी स्वतःला विचारावा. तसेच अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची बाळासाहेबांच्या खोलीत काय चर्चा झाली, हे देखील सांगावे, असे आव्हान संजय राऊत यांनी करताना एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, त्यावेळी मी मातोश्रीवर होतो. बंद दारा आड चर्चा झाली होती. परंतु मी चर्चेत नव्हतो. आता एकनाथ शिंदे आरोप करत आहेत. त्यांना तेव्हा काय स्थान होते. ते तेव्हा पक्षाचे नेते देखील नव्हते. त्यांना पक्षाचा नेता आम्ही केले, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

मोदी-शहांमुळे एकनाथ शिंदेंना खोटे बोलण्याचे व्यसन

एकनाथ शिंदेंवर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचा गुलाम आणि नोकर झाला आहे. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यामुळेच ते अशी बेताल वक्तव्य करत आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहांबरोबर राहून एकनाथ शिंदे यांना खोटे बोलण्याचे व्यसन लागले आहे. ते खोटे बोलण्याचा गांजा मारतात आणि अशी वक्तव्य करतात. पण मुख्यमंत्री पदावर बसले म्हणजे त्यांना काहीही बोलण्याचे लायसन्स दिले गेलेले नाही, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – Supriya Sule: मेरिट बघून मला पास करा, सुळेचं जनतेला आवाहन; तर ‘अजितदादां’ना दिलं जशास तसं उत्तर

बाळासाहेबांनी शिंदेंचा कडेलोट केला असता

देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची एकनाथ शिंदे यांना आठवण करून देताना संजय राऊत म्हणाले की, हॉटेल ब्लू सीमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, पावर स्टेरिंग फिफ्टी-फिफ्टी आहे. पण आता एकनाथ शिंदे यांच्या कानात गोळे बसलेत का? त्यांच्या कानाला बुच बसलाय का? असे प्रश्न उपस्थित करत आम्हाला तडजोड करायची असती तर आम्ही केव्हाच केली असती. आम्ही लढत आहोत. तुमच्यासारखे पळकुटे नाही आणि डरपोकही नाही. त्यामुळे आम्ही बाळासाहेबांची शिवसेना दिल्लीच्या पायाशी ठेवली नाही. असे म्हणत संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा आणि भारतीय जनता पक्षाचा अभिनंदनचा ठराव झाला. पण काय ही लाचारी. जर आज बाळासाहेब असते तर त्यांचा कडेलोट केला असता. या लोकांच्या कमरेत जोर आहे. म्हणून ते दिल्लीत जाऊन वाकतात, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -