घरमहाराष्ट्रSindhudurg Submarine प्रकल्पावरून राजकारण रंगले, तर नितेश राणे म्हणाले...

Sindhudurg Submarine प्रकल्पावरून राजकारण रंगले, तर नितेश राणे म्हणाले…

Subscribe

सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पावरून विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांच्या या टीकेवर सत्ताधाऱ्यांमधील आमदारांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी विरोधकांना सुनावले आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील वेदांता फॉक्सकॉनसह मुंबईतील डायमंड बोर्स गुजरात राज्याने पळवून नेला. यामुळे लाखो- कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रातून गेली. महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात जात असल्याने अनेकांचे रोजगार हिरावले जात असल्याची ओरड विरोधक करत असतानाच दुसरीकडे आता सिंधुदुर्गमधील आणखी एक प्रकल्प सुरू होण्याधीच गुजरातला पळविला असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. ज्यामुळे आता या प्रकल्पावरून नव्या वादाला सुरुवात झाली असून राज्यातील राजकारण देखील तापले आहे. सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पावरून विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांच्या या टीकेवर सत्ताधाऱ्यांमधील आमदारांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी विरोधकांना सुनावले आहे. (Politics over Sindhudurg Submarine Project, Nitesh Rane said)

हेही वाचा – “…पण आमचा महाराष्ट्र का लुटत आहात?” Sanjay Raut यांचा पंतप्रधान मोदींना संतप्त सवाल

- Advertisement -

याबाबत आमदार नितेश राणे म्हणाले की, काही दिवसांपासून सिंधुदुर्गमध्ये होणाऱ्या पाणबुडी प्रकल्पाबाबत उलटसुलट बातम्या येत आहेत. अपेक्षेप्रमाणे माहिती न घेता आमचे विरोधक भुंकण्याचे काम करीत आहेत. कोकणात आणि सिंधुदुर्गमध्ये येणारा हा पाणबुडी प्रकल्प कुठेही गुजरातला जात नाही. जसा पाणबुडी प्रकल्प कोकणात आहे तसाच प्रकल्प गुजरातमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातप्रमाणे केरळामध्ये देखील पाणबुडी प्रकल्प होत आहे. कोणीही आपला प्रकल्प पळवलेला नाही.

तसेच, 2018 मध्ये दीपक केसरकर जेव्हा अर्थ राज्यमंत्री होते तेव्हा त्यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली. नंतर मविआच्या काळात तेव्हाचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेने कोणतीही चालना दिली नाही. प्रकल्प बंद कसा पडेल याकडे त्यांनी जास्त भर दिल्याने आज गुजरात आणि केरळात काम सुरू झाले. महाराष्ट्रात ‘जैसे थे’ स्थिती आदित्य ठाकरेंच्या नाकर्तेपणामुळे झाली आहे, अशी सडकून टीकाही त्यांनी केली आहे. त्यामुळे महायुतीचे सरकार हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचा विश्वासही यावेळी नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील सुमारे दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला वेदांता-फॉक्सकॉन हा मेगा प्रकल्प याआधीच गुजरातमध्ये गेला आहे. त्यानंतर टाटा एअरबस हा प्रकल्प देखील गुजरातमध्ये गेला आहे. तब्बल 22 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प होता. या मोठ्या प्रकल्पांपैकीच एक असलेला निवती रॉक्स जवळील समुद्रात पाण्याखालील अंतरंग पाहण्याची योजना असलेला पाणबुडी प्रकल्प गुजरात सरकारने पळविला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची पाणबुडी गुजरातेतून बाहेर निघणार आहे, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -