घरक्राइमIIT BHU बंदुकीचा धाक दाखवत विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; भाजपाशी संबंधित आरोपींना अटक

IIT BHU बंदुकीचा धाक दाखवत विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; भाजपाशी संबंधित आरोपींना अटक

Subscribe

वाराणसी : 1 नोव्हेंबरच्या रात्री IIT BHU मध्ये तीन तरुणांनी बंदुकीच्या धाकावर एका विद्यार्थिनीला कपडे उतरवण्यास भाग पाडले. यानंतर तरुणांनी तिचे चुंबन घेत सामूहिक बलात्कार करत व्हिडिओही बनवला होता. या घटनेचे संतप्त पडसाद उमटल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी पोलिसांनी आयआयटी बीएचयूच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. (IIT BHU student gang-raped at gunpoint Accused related to BJP arrested)

वाराणसी पोलिसांनी विद्यार्थीनीच्या बलात्कार प्रकरणी ब्रिज एन्क्लेव्ह कॉलनी सुंदरपूर येथील कुणाल पांडे आणि आनंद उर्फ ​​अभिषेक चौहान आणि जीवाधिपूर बाजारडिहा येथील सक्षम पटेल या आरोपींनी अटक केली आहे. याशिवाय आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी भाजपाशी संबंधित असून अनेक बड्या नेत्यांसोबत त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Crime News : हत्येच्या प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी 31 वर्षांनी ठोकल्या फिल्मी स्टाईलने बेड्या

तिन्ही आरोपी भाजपाचे पदाधिकारी

बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांचे जवळचे असल्याचे समोर आले आहे. हे तिन्ही आरोपी भाजपा आयटी सेलचे महानगर पदाधिकारी आहेत. कुणाल पांडे हा भाजपा महानगर युनिटच्या आयटी सेलचा समन्वयक आहे, तर सक्षम पटेल सह-संयोजक आहे. आनंद चौहान हा कँट विधानसभा मतदारसंघातील आयटी सेल समन्वयक आहे. काही दिवसांपूर्वी काशी प्रांत अध्यक्ष दिलीप सिंह पटेल यांच्याकडेही सक्षम पटेल पदाधिकारी म्हणून काम करत होता. याशिवाय कुणाल पांडे आयटी सेलच्या सदस्यांची नियुक्ती करत होता. कुणाल पांडे हा सराईसर्जन प्रभागातील भाजप नगरसेवकाचा जावई आहे. कुणाल पांडेचा विवाह सराईसर्जन प्रभागाचे नगरसेवक मदन मोहन तिवारी यांच्या मुलीशी गेल्यावर्षी झाला होता. 2022 मध्ये आनंद चौहान याच्याविरुद्ध भेलूपूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हाही दाखल आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

IIT BHU मधील गणित अभियांत्रिकी विभागातील बीटेकची विद्यार्थिनी 1 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास न्यू गर्ल्स हॉस्टेलमधून फिरायला निघाली होती. ती कॅम्पसमधील गांधी स्मृती वसतिगृह चौकात पोहोचली, तेव्हा तिला तिची मित्र तिथे दिसला. याचवेळी करमण वीर बाबा मंदिराजवळ मागून बुलेटवर तीन तरुण आले आणि पीडित मुलीसह तिच्या मित्राचा रस्ता अडवला. पीडित विद्यार्थिनीने लंका पोलीस ठाण्यात दिलेल्या एफआयआरमध्ये म्हटले की, माझा मित्र काही वेळाने निघून गेल्यानंतर आरोपींनी पुन्हा एकदा माझा रस्ता अडवला आणि गळफास लावून एका कोपऱ्यात नेले. आधी किस केले, नंतर कपडे काढत व्हिडिओ बनवला, फोटो काढले आणि बलात्कार केला. यानंतर मी आरडाओरडा केल्यावर त्या तरुणांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. तरुणांनी माझा फोन घेतला, 10 ते 15 मिनिटे मला अडवून ठेवले आणि यानंतर ते मला सोडून निघून गेले. दरम्यान, पीडित विद्यार्थींनीवरील बलात्काराच्या निषेधार्थ संपूर्ण कॅम्पस बंद ठेवला होता. वर्गखोल्या आणि प्रयोगशाळेतील संशोधनाचे कामही बंद होते. याशिवाय संपूर्ण कॅम्पसची इंटरनेट सेवाही बंद होती.

हेही वाचा – ठाण्यात शनिवारी Rave Partyवर पोलिसांकडून कारवाई; 95 जण ताब्यात

दोन महिन्यांनंतर आरोपींना अटक

दरम्यान, तब्बल दोन महिन्यांनंतर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. बीएचयू आयआयटी कॅम्पसमध्ये हैदराबाद गेट ते बायपास आणि करौंडी मार्ग, बीएचयू मेन गेट ते लंका-रविदास गेट रोडपर्यंत विविध पोलीस पथके 170 हून अधिक सीसी कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केले. यानंतर सुसुवाही परिसरात राहणारा तरुणासह त्याच्या मित्राला गुन्हे शाखा आणि लंका पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली. यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -