घरमहाराष्ट्रPolitics: स्वत:ला स्वाभिमानी म्हणवणारे आता दिल्लीत...; राऊतांचा शिंदेंसह अजितदादांवर घणाघात

Politics: स्वत:ला स्वाभिमानी म्हणवणारे आता दिल्लीत…; राऊतांचा शिंदेंसह अजितदादांवर घणाघात

Subscribe

मुंबई: स्वत:ला स्वाभिमानी म्हणवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना लोकसभेच्या दोन-चार जागांसाठी दिल्लीत जाऊन व्यापाऱ्यांची भांडी घासत आहेत. डुप्लीकेट शिवेसना आणि डुप्टीकेट राष्ट्रवादी यांचं नशीबच हे आहे. नुसत्या 4 ते 5 जागा यांना दिल्या जात आहेत, कुत्र्यासमोर जसं हाडूक टाकतात तशी यांची स्थिती आहे, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (Politics Those who call themselves self-respecting are now washing dishes in Delhi Sanjay Raut s attack on Ajit Pawar along with Chief Minister Eknath Shinde)

सध्या लोकसभेच्या जागावाटपावरून महायुतीत खलबतं सुरू असल्याचं दिसत आहे. गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सुरू होती. यावरून संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवसेनेच्या शाखेचे उद्धाटन केल्याबद्दलबही त्यांनी टीका केली. लोढा यांच्याहस्ते शिवसेना शाखेचं उद्धाटन करावे लागतं, इतके वाईट दिवस शिवसेनेवर कधीही आले नव्हते. ज्या बिल्डर्सच्या बिल्डींगमध्ये मराठी लोकांना घरं दिली जात नाहीत. त्यांच्याकडून शाखेचं उद्घाटन करणं हे योग्य नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

रोहित पवारांचा छळ केला जातोय

आमदार रोहित पवार आणि त्यांच्या कुटुंबाला मी ओळखतो. ते चुकीचं काम करु शकत नाहीत. रोहित पवारांची चौकशी करून त्यांचा वारंवार छळ केला जात आहे. रोहित पवारंनी काय गुन्हा केला? त्यांचा उद्योग आहे, त्यात काही गोष्टी वर-खाली झाल्या असतील म्हणून धाडी टाकून त्यांच्या मालमत्ता जप्त करुन बदनाम करणं योग्य नाही. महाराष्ट्रावर आक्रमण करणाऱ्या दिल्लीच्या मुघलशाहीसमोर न झुकण्याची भूमिका रोहित पवार यांनी घेतल्यामुळेच त्यांचा छळ केला जात आहे. महाराष्ट्राचे लचके तोडून महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ले करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे सुरू असताना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री शांत बसले आहेत. पण, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवार यांच्यासारखे अनेक लोक त्यांच्याविरोधात ठामपणे उभो आहोत.

- Advertisement -

(हेही वाचा: MNS Vardhapan Din: मला माझ्या कडेवर माझीच पोरं खेळवायची आहेत; राज ठाकरे असं का म्हणाले?)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -