घरमहाराष्ट्रराम मंदिराच्या मुद्यावर काय म्हणाले नाना पाटेकर?

राम मंदिराच्या मुद्यावर काय म्हणाले नाना पाटेकर?

Subscribe

राम मंदिरापेक्षा गरिबाच्या पोटात दोन घास जाणं महत्त्वाचं आहे असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे. पुण्यातील खडकवासला धरणातील गाळ उपसा करून धरणाला पुनरूर्जिवित करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यावेळी ते बोलत होते.

राम मंदिराच्या मुद्यावरून अभिनेते आणि नामचे अध्यक्ष नाना पाटेकर यांनी आपलं सडेतोड मत व्यक्त केलं आहे. राम मंदिरापेक्षा गरिबाच्या पोटात दोन घास जाणं महत्त्वाचं आहे असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे. पुण्यातील खडकवासला धरणातील गाळ उपसा करून धरणाला पुनरूर्जिवित करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये नाम संस्था देखील सहभागी झाली आहे. यावेळी बोलताना नाना पाटेकर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काही जणांना राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो. पण, मला मात्र गरिबाच्या पोटात दोन घास गेले पाहिजेत तर मला मंदिरात बांधल्यासारखं वाटेल. त्यामुळे कुणाला काय वाटतं यावर सर्व अवलंबून आहे. कुणाला राम मंदिर महत्त्वाचं वाटत असेल तर ते त्यांचं मत आहे असं नाना पाटेकर यांनी यावेळी म्हटलं आहे.

वाचा – अन्यथा राम मंदिराच्या निर्मितीला सुरुवात करणार; विहिंपचा इशारा

सध्या निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचा मुद्दा जोरात चर्चिला जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप, शिवसेना आणि भाजप देखील आता राम मंदिराचा मुद्दा काढताना दिसत आहे. याच मुद्यावर शिवसेनेनं अयोध्येचा दौरा देखील केला. यावेळी ‘पहले राम मंदिर, फिर सरकार’ अशी घोषणा शिवसेनेनं दिली. तर संघानं देखील राम मंदिरासाठी कायदा करा, जमिनीचं अधिग्रहण करा अशी मागणी केली आहे. विहिंप देखील राम मंदिरासाठी आक्रमक झालेली पाहायाला मिळत आहे. त्यासाठी विहिंपनं अयोध्येमध्ये बाईक रॅली आणि मोर्चे देखील काढलेले आहेत. शिवाय, शिवसेनेनं देखील राम मंदिर केव्हा बांधताय? याची तारीख सांगा. असं म्हटलं आहे. त्यामुळे भाजपसमोरच्या अडचणी या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.

वाचा – राम मंदिर बांधण्यावरुन जैश-ए-मोहम्मदचा मोरक्याची भारताला धमकी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -