घरदेश-विदेशसिगरेटचे थोटुक बनले 'बुमरँग', ट्रक आगीत खाक

सिगरेटचे थोटुक बनले ‘बुमरँग’, ट्रक आगीत खाक

Subscribe

सिगरेटचे थोटुक मी गाडीबाहेर टाकले. त्यानंतर काहीच वेळात आग लागली..

चीनमध्ये एका ड्रायव्हरला सिगरेट फुंगणे महागात पडले आहे. कारण या ड्रायव्हरने सिगरेट फुंकल्यानंतर सिगरेटचे थोटुक गाडीबाहेर टाकले. पण ते सिगरेट बुमरँग होऊन त्याच्याच गाडीवर आले आणि गाडीने पेट घेतला. सुदैवाने यात ड्रायव्हर वाचला. पण त्याचा ट्रक मात्र आगीत जळून खाक झाला आहे. त्याच्या या क्षुल्लक चुकीमुळे त्याने त्याचा ट्रक गमावला आहे.

वाचा- कल्याणमध्ये चायनिज हॉटेलला आग; अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

नेमकं काय झालं?

हा सगळा प्रकार दक्षिण चीनमध्ये घडला आहे. हा ड्रायव्हर गाडी चालवत असताना सिगरेट फुंकत होता. सिगरेट फुंकल्यानंतर त्याने सिगरेटचे थोटुक गाडी बाहेर फेकले. पण ते थोटुक गाडीबाहेर पडलेच नाही तर ते बुमरँग होऊन पुन्हा त्याच्याच ट्रकमध्ये आले आणि त्या ट्रकने क्षणार्धात पेट घेतला. ट्रकला आग लागलेली कळताच स्थानिकांनी लागलीच आग विझवण्यासाठी धाव घेतली. आणि त्यांनी आग विझवण्यात यश मिळवले. या आगीत ट्रक जळून खाक झाला आहे.

- Advertisement -
वाचा- मुंबईत आगीमुळे ६०९ लोकांचा मृत्यू!

कबूल केला गुन्हा

चालत्या ट्रकला आग कशी लागली याचा शोध घटनास्थळी आलेली पोलीस घेत होती. त्यावेळी ड्रायव्हरकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने वाहन चालवताना सिगरेट फुंकत असल्याचे सांगितले. सिगरेटचे थोटुक मी गाडीबाहेर टाकले. त्यानंतर काहीच वेळात आग लागली असे त्यांने सांगितल्यानंतर सिगरेटचे थोटुक हवेमुळे ट्रकच्या इंजिनकडे आले असावे आणि त्या मुळेच ट्रकने पेट घेतला, असे पोलिसांनी सांगितले आहे.

पाहा- भिवंडीमध्ये पेपरच्या गोडाऊनला भीषण आग
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -