घरमनोरंजनआता आपल्याला बरं वाईट समजायला हवं - शाहरुख खान

आता आपल्याला बरं वाईट समजायला हवं – शाहरुख खान

Subscribe

बॉलीवूडचा किंग शाहरुख खान याने 'मुंबई २.०' या कार्यक्रमाला हजेरी लावली असताना तिथे त्याने बॉलीवूड सिनेसृष्टीतील काही त्रुटींवर भाष्य केले आहे.

बॉलीवूडचा किंग शाहरुख खान याने शनिवार, १ डिसेंबर रोजी ‘मुंबई २.०’ या कार्यक्रमाला हजेरी लावली असताना तिथे त्याने बॉलीवूड सिनेसृष्टीतील काही त्रुटींवर भाष्य केले आहे. आता आपल्याला बॉलीवूडमध्ये व्हिडिओबाबतच्या साक्षरतेची गरज असल्याचे त्याने म्हटले आहे. हा कार्यक्रम राज्या सरकारने आयोजित केला असून यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती दर्शवली होती. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना शाहरुखने चित्रपटांच्या आधुनिकतेबाबत वक्तव्य केले आहे.

नेमकं काय म्हणाला शाहरुख

मला माझ्या चित्रपटनिर्मितीच्या माध्यमातून असं काही करण्याची संधी मिळत आहे. ज्यातून आताची पीढी काहीतरी शिकू शकते. लोकांपर्यंत पोहोचण्याची सोशल मीडिया, इतर माध्यमं हे चित्रपट आणि टीव्हीपेक्षाही प्रभावी माध्यमं बनली आहेत. सोशल मीडियाने सर्वांना अक्षरशः वेड लावलं आहे. पंरतू अद्यापही आपल्या देशात व्हिडिओबेस साक्षरतेची गरज असल्याचे मला वाटते. चित्रपट हे केवळ श्राव्य माध्यम आहे आणि आपण सर्वाधिकपणे बोलण्यातून प्रचार करण्यावर भर देतो. आपण गाणी ऐकतो, सर्व विषयांवर चर्चा करतो. मात्र आपण दृकश्राव्य माध्यमाला महत्त्व कमी देतो. आपल्या देशात कवी, लेखक आणि गायक आहेत. परंतू जगभराती दृकश्राव्य हे माध्यम अतिशय प्रभावी बनत चाललं आहे.

- Advertisement -

व्हिडिओ साक्षरता हवी 

पुढे शाहरुख म्हणाला की, जेव्हा आपण लहानपणी ट्विंकल ट्विंल लिटिल स्टार हे बालगीत ऐकायचो, तेव्हा खरोखर डोळ्यासमोर तारे दिसू लागायचे. तशी कल्पना करायचो. परंतू आता सर्व इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे आता आपल्याला काय चांगल आणि काय वाईट यामधील फरक ओळखता यायला हवा. त्यासाठी व्हिडिओ हे प्रभावी माध्यम ठरू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -