घरताज्या घडामोडी'प्रहार जनशक्ती' च्या तुषार पुंडकर यांच्यावर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू

‘प्रहार जनशक्ती’ च्या तुषार पुंडकर यांच्यावर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू

Subscribe

प्रहार जनशक्ती पश्राचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर अकोट शहारातील पोलीस कार्टरजवळ गोळीबार करण्यात आला आहे. यात तुषार पुंडकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान हा गोळीबार कोणी केला याबाबत सध्या तपास सुरु आहे.

रात्री 10.30 च्या सुमारास प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर अकोट शहरातल्या पोलीस कॉर्टरजवळ अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारात पुंडकर गंभीर जखमी झाले. त्यांना अकोला शहरातल्या आयकॉन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मध्यरात्री 2.51 च्या दरम्यान पुंडकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
पुंडकर यांच्यावर हा हल्ला जुन्या वादातून झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या गोळीबाराचा तपास अकोट पोलिसांकडून सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -