घरमनोरंजनप्रथमेश परब लवकरच 'या' चित्रपटात दिसणार!

प्रथमेश परब लवकरच ‘या’ चित्रपटात दिसणार!

Subscribe

सिनेसृष्टीत नेहमीच दोन दिग्गज काहीतरी नवं करण्याच्या ध्यासाने एकत्र येतात आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतात. मराठी सिनेसृष्टीही याला अपवाद नाही. मराठीतही आजवर ब-याच दिग्गजांनी एकत्र येऊन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याची किमया साधली आहे. आता एका आगामी मराठी सिनेमासाठी एक नामवंत दिग्दर्शक आणि तितकाच गाजलेला निर्माता एकत्र आल्याचं पहायला मिळणार आहे. दिग्दर्शक समीर आशा पाटील यांचं नाव जसं आज अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे, तसंच आजवरच्या कारकिर्दात निर्माता म्हणून उत्कृष्ट कामगिरी करीत निर्माता अजय ठाकूर यांनीही नावलौकिक मिळविला आहे. हे दोन दिग्गज ‘डार्लिंग’ या आगामी सिनेमाच्या निमित्तानं प्रथमच एकत्र आले आहेत.

- Advertisement -

दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी आतापर्यंत नेहमीच प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीचे सिनेमे दिले आहेत, तर अजय ठाकूर यांनीही दर्जेदार मनोरंजक सिनेमांच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन केलं आहे. त्यामुळे ‘डार्लिंग’च्या निमित्ताने दिग्दर्शक आणि निर्मिती पातळीवरील दोन मातब्बर व्यक्तीमत्त्व एकत्र आल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. समीर आशा पाटील यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘चौर्य’, ‘यंटम’ आणि ‘वाघे-या’ या सिनेमांनी प्रेक्षकांना वास्तववादी चित्र दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. अजय ठाकूर यांनी ‘तानी’, ‘फुंतरू’ आणि ‘टकाटक’ या सिनेमांच्या माध्यमातून वस्तुस्थिती निदर्शनास आणतानाच प्रेक्षकांना कल्पनाविश्वातही रमण्याची संधी दिली आहे. त्यामुळे आता ‘डार्लिंग’मध्ये हे दोघे काय कमाल करतात ते पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

View this post on Instagram

??

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab) on

- Advertisement -

‘डार्लिंग’ सिनेमाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. निर्माते अमित धुपे, अजय ठाकूर, व्ही. जे. शलाका आणि निखिल खजिनदार यांनी 7 हॉर्स एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि कथाकार मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली ‘डार्लिंग’ची निर्मिती केली आहे. ‘डार्लिंग’चं मोशन पोस्टर पाहिल्यावर समीर आशा पाटील यांच्या या सिनेमात पुन्हा एकदा काहीतरी धम्माल पाहायला मिळणार असल्याची चाहूल लागते. ‘डार्लिंग’शी निगडीत असलेल्या इतर गोष्टीही लवकरच रिव्हील करण्यात येणार असल्याचे दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी सांगितले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -