घरAssembly Battle 2022UP Election 2022: २०२४मध्ये भाजप सरकार आलं तर देशाचं संविधान धोक्यात -...

UP Election 2022: २०२४मध्ये भाजप सरकार आलं तर देशाचं संविधान धोक्यात – प्रकाश आंबेडकर

Subscribe

आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीमधील वंचित बहुजन आघाडीची भूमिका प्रकाश आंबेडकरांनी आज स्पष्ट केली. बसपाला मतदान न करता सपाला मतदान करा, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी मतदारांना केलं आहे.

२०२४ मध्ये भाजपचं सरकार आलं तर देशाचं संविधान धोक्यात असल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं. आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उत्तर प्रदेश निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘भाजपला केंद्रीय एजन्सीचा वापर करून विरोधी पक्ष खिळखिळा करायचा आहे. सध्या बसपाची स्थिती दयनीय असून ते भाजप आणि संघाला टक्कर देऊ शकत नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला सत्तेत आणा,’ असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी मतदारांना केले.

नक्की काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

‘वंचित बहुजन आघाडीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची चर्चा झाली. त्याच्याबरोबर भाजप, आरएसएसचं केंद्रामधलं सरकार ज्या पद्धतीने ईडीचा, सीबीआयचा वापर करतंय. वेगवेगळ्या एजन्सीचा वापर करतंय. याच्यावरून एकंदरीत दिसतंय की, त्यांना विरोधी पक्ष खिळखिळ करायचा आहे. २०२४ला स्वतःचा मार्ग मोकळा करून देशाचं संविधान बदलण्याचं राजकारण सुरू करायचं आहे,’ असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -

पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘आरएसएस, भाजपचा केंद्राचा मार्ग हा उत्तर प्रदेशमधून जातो. आता उत्तर प्रदेशमध्ये निवडणूका आहेत. सध्या बसपा ही आरएसएस, भाजपला टक्कर देऊ शकते का? चंद्रशेखर आझाद हे टक्कर देऊ शकतात का? अशी चर्चा सुरू आहे. पण आताच्या परिस्थितीमध्ये दोघांचीही परिस्थिती दयनीय असल्याचे दिसतेय आणि हे टक्कर देऊ शकणार नाहीत, अशा भूमिकेला आम्ही आलो आहोत. जी आता सरळ सरळ लढाई दिसतेय, ती म्हणजे समाजवादी पक्ष विरुद्ध आरएसएस, भाजप अशा स्वरुपाची आहे. म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की, आंबेडकरवादी जो आहे, मानवतावादी जो आहे, सेक्युलरवादी जो आहे, त्याला आपण आवाहन केलं पाहिजे की, त्यांनी या निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाला मतदान करावं. हे एक बरोबर आहे की, आंबेडकरवाद्यांचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे, राजकीय अस्तित्व राहिलं पाहिजे म्हणून तिथे चर्चा आहे. एका निवडणुकीमध्ये आपण बायपास दिला, तर फार फरक पडत नाही, असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. आपलं स्वतःचं अस्तित्व हे निवडणुकीनंतरसुद्धा सुरुवात करता येतं. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मानवतावादी, सेक्युलरवादी, आंबेडकरवादी या सर्वांनी समाजवादी पक्ष अखिलेश यादव यांच्या पाठीमागे उभे राहावं आणि त्यांच्याचं उमेदवाराला मत देऊन प्रचंड मतदान जिंकवावं ही भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे.’


हेही वाचा – Elections 2022 : ५ राज्यांतील ‘या’ सर्वाधिक महत्त्वाच्या विधानसभेच्या जागा, कोण बाजी मारणार याकडे देशाची नजर

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -