घरताज्या घडामोडी....म्हणून UAE मध्ये लग्नाआधी महिलांना 'ही' टेस्ट करावी लागते

….म्हणून UAE मध्ये लग्नाआधी महिलांना ‘ही’ टेस्ट करावी लागते

Subscribe

युएईमध्ये महिलांना लग्नाच्या आधी ह्यूमन पेपिलोमा वायरस म्हणजेच HPV ची लस घेणे आणि टेस्ट करण्यासाठी सांगितले जातं आहे. जेणेकरुन महिलांमधील गर्भाशयातील कॅन्सरच्या ( Cervical Cancer) चा धोका कमी करतो. जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या आकडेवारीनुसार, सर्विकल कॅन्सर हा सर्वाधिक महिलांमध्ये होणारा कॅन्सरचा प्रकार आहे. WHO च्या माहितीनुसार, 2020 मध्ये सर्विकल कॅन्सरचे 6,04,000 इतक्या नवे प्रकरण समोर आले होते.

युएईमध्ये महिलांना लग्नाच्या आधी ह्यूमन पेपिलोमा वायरस म्हणजेच HPV ची लस घेणे आणि टेस्ट करण्यासाठी सांगितले जातं आहे. जेणेकरुन महिलांमधील गर्भाशयातील कॅन्सरच्या ( Cervical Cancer) चा धोका कमी करतो. जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या आकडेवारीनुसार, सर्विकल कॅन्सर हा सर्वाधिक महिलांमध्ये होणारा कॅन्सरचा प्रकार आहे. WHO च्या माहितीनुसार, 2020 मध्ये सर्विकल कॅन्सरचे 6,04,000 इतक्या नवे प्रकरण समोर आले होते. याशिवाय 3 लाख 42 हजार महिलांचा मृत्यू सर्विकल कॅन्सरमुळे मृत्यू झाला आहे. WHOच्या मते, HPVचा प्रसार प्रामुख्याने शारिरीक संबंधातून होतो आणि बहुतेक लोकांना लैंगिक क्रियाकलापानंतरच संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. . या विषाणूचा वारंवार संसर्ग झाल्यास सर्विकल कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.

महिलांना HPV लस घेण्याचे आवाहन

नुकतच यामागील एक संशोधन समोर आले आहे. अबू धाबी हेल्थ सर्व्हिसेस कंपनी (SEHA) ने दिलेल्या माहितीनुसार, हा सर्विकल कॅन्सर टाळता येतो आणि जागरूकतेने उपचार करता येतात. या कॅन्सरवर प्रतिबंध करण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे लसीकरण हा एकच मार्ग आहे. SEHA ने 13 ते 26 वयोगटातील सर्व महिलांना HPV लस घेण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

… म्हणून लग्नाला दोन वर्षे उलटूनही गर्भधारणा होऊ शकली नाही

SEHA या कंपनीने युएईच्या महिलांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले. याशिवाय त्यांनी एक घटना देखील सांगितली आहे. 28 वर्षीय महिलेला लग्नाला दोन वर्षे उलटूनही गर्भधारणा होऊ शकली नाही. नंतर कळलं की तिला सर्विकल कॅन्सर आहे. मात्र यावरील योग्य उपचारानंतर महिला पूर्णपणे बरी झाली. UAE मधील मदिनत खलिफा हेल्थकेअर सेंटरमधील प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ डॉ. शाहद फैसल अल आयला म्हणतात की, गर्भाशयाच्या निगडीत असणारा हा कॅन्सरवर जर लवकरात लवकर उपचार केल्यास स्त्री पूर्णपणे बरी होऊ शकते.

Cervical Cancer चा धोका भारतातील महिलांनाही

Cervical Cancer हा भारतीय महिलांमध्येदेखील दुसरा सर्वात मोठा कर्करोग आहे. भारतातील स्त्रिया सुरुवातीच्या काळात लाजेमुळे किंवा आरोग्याबाबत निष्काळजीपणा केल्यामुळे हे आजार अधिक बळावतात. या आजाराकडे बहुतांश स्त्रिया दुर्लक्ष करतात. मात्र, अशा स्त्रिया जेव्हा डॉक्टरकडे जातात तेव्हा या आजारावर निदान करणे खूप कठीण होऊन जाते. मानवी पॅपिलोमा विषाणूमुळे हा कर्करोग शरीरात पसरतो. ते सेक्सद्वारे स्त्रीच्या शरीरात पोहोचते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 90 टक्के प्रकरणांमध्ये हा विषाणू संसर्ग स्वतःच नष्ट होतो. बहुतेक महिलांना हा कर्करोग वयाच्या 45 वर्षांनंतर होतो.

- Advertisement -

Cervical Cancer ची लक्षणे काय आहेत? 

  • मासिक पाळी संपल्यानंतरही रक्तस्त्राव होतो.
  • सेक्स नंतर रक्तस्त्राव
  • वारंवार योनिमार्गात संक्रमण आणि लघवीनंतर जळजळ
  • रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्त्राव
  • योनीतून पांढरा स्त्राव
  • Cervical cancer प्रगत अवस्थेत कंबर, पाय-हाडे दुखणे

हे ही वाचा – MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांना दणका, न्यायालयाचा आयोगाच्याबाजूने निर्णय


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -