घरमुंबई'वंचित आघाडी'मध्ये बिघाडी?; लक्ष्मण मानेंची आंबेडकरांकडे राजीनाम्याची मागणी

‘वंचित आघाडी’मध्ये बिघाडी?; लक्ष्मण मानेंची आंबेडकरांकडे राजीनाम्याची मागणी

Subscribe

आघाडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे लोक घुसले असून वंचित बहुजन आघाडी आता वंचितांची राहिलेली नाही, असा खळबळजनक आरोप वंचितचे नेते लक्ष्मण माने यांनी केला आहे.

आघाडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे लोक घुसले असून वंचित बहुजन आघाडी आता वंचितांची राहिलेली नाही, असा खळबळजनक आरोप वंचितचे नेते लक्ष्मण माने यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीतून फारकत घेतलेल्या लक्ष्मण माने यांनी हा गंभीर आरोप करत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या कामाची पद्धत पाहता आपण त्यांच्यासोबत काम करू शकत नसल्याचे सांगताना, पक्षात संघाच्या लोकांना स्थान देणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनीच आता राजीनामा द्यावा, अशी मागणी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माने यांनी केली आहे.

आंबेडकरांसोबत काम करू शकत नाही

प्रकाश आंबेडकरांमुळेच लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एकही जागा निवडून आली नाही. संघ आणि भाजपाच्या लोकांना प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीमध्ये घेतलं आहे. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा दुरुपयोग करत आहेत. संघ आणि आरएसएसच्या लोकांनी वंचित बहुजन आघाडी व्यापून टाकली आहे. त्यामुळे सध्याची वंचित आघाडी ही बहुजनांची नव्हे, तर उच्चवर्णीयांची झाली आहे. वंचित बहुजन आघाडी ही खरी आमची आहे. राज्यभर आम्ही खपलोय. पदरचे पैसे घालून काम केलंय. हे आयत्या बिळावरचे नागोबा असल्याचं म्हणत त्यांनी पडळकरांना लक्ष्य केले आहे, अशी गंभीर टीका माने यांनी प्रकाश आंबेडकरांवर केली आहे.

- Advertisement -

नाराज लक्ष्मण माने 

लोकशाहीत मीडियाशी बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेस-राष्ट्रवादी किंवा इतर पक्षांशी आघाडी करायला हवी होती. लोकसभा निवडणुकीत आमच्यामुळे दहा जागा गेल्यात. प्रतिगामी पक्षांना मदत हा अधःपात होता आणि तो माझ्याकडून झाला. त्याचा मला पश्चात्ताप आहे. पदरचे पैसे घालून आम्ही काम केलं. मी गोपीचंद पडळकर यांचं नाव सुचवलं, पण ते अध्यक्षांनी माझ्याकडून वदवून घेतलं होतं. लाल दिव्याच्या गाड्या ओवाळून टाकल्यात, असंही लक्ष्मण माने म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -