घरमहाराष्ट्रनाशिक'पबजी'ने घेतला इंजिनिअरचा बळी, श्रीरामपूरमधील धक्कादायक घटना

‘पबजी’ने घेतला इंजिनिअरचा बळी, श्रीरामपूरमधील धक्कादायक घटना

Subscribe

‘पबजी’मधील पराभवाच्या नैराश्यातून आयटी इंजिनियर तरूणाची आत्महत्या

ब्लू व्हेल पाठोपाठ पबजी या गेममुळे जगभरात अनेक आत्महत्या झाल्या. आता हे लोन ग्रामीण भागातही पोहचले आहे. तालुक्यातील टाकळीभान येथील राहूल पवार या आयटी इंजिनियर नवविवाहित तरूणाने दोन बोअरच्या शॉर्ट गनने गोळ्या झाडून आत्महत्या केली. राहूल हा श्रीरामपूर बाजार समिती माजी सभापती नानासाहेब पवार यांचा मुलगा होता.

उच्चशिक्षित राहूल (वय २८) याचा फेब्रवारीत विवाह झाला होता. नोकरीच्या मागे न लागता त्याने गावात व्यवसाय करण्याचे ठरवले. यानुसार त्याने टाकळीभान येथील शेतात कुकुट्टपालनाचा प्रकल्पही उभारला. आषाढ असल्याने त्याची पत्नी नुकतीच माहेरी गेली होती. त्याच्या मित्रांच्या म्हणन्यानुसार तो रात्री उशिरापर्यंत पबजी मोबाईल गेम खेळत असे. घटनेच्या रात्रीही तो रात्री उशिरापर्यंत गेमखेळत ऑनलाईन असल्याचे अनेक मित्रांनी पाहिले.

- Advertisement -

बुधवारी (३ जुलै) रात्री राहूलने आता सकाळीच माझ्या खोलीचा दरवाजा उघडा. मला माफ करा, असा संदेश मोबाईलवरून त्याच्या एका नातेवाईकाला पाठवला. त्यानंतर रात्री २ च्या सुमारास आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना सकाळी लक्षात आली. पवार कुटुंबाच्या लक्षात आली. भाऊसाहेब पवार यांनी राहूल यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दरवाजा तोडला. तेव्हा राहूल हा मृतावस्थेत आढळून आला. श्रीरामपूर तालूका पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृृत्यूची नोंद झाली. दरम्यान, राहूल याने पबजी गेममधील पराभवानंतर आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची चर्चा टाकळीभान गावात होत असली तरी कौटुंबिक नैराश्यातून त्याने आपली जीवनयात्रा संपविली असल्याचा दावा पोलीस उप अधीक्षक राहूल मदने यांनी केला आहे. राहूल यांच्या मागे पत्नी, आई, वडील, भाऊ ,चुलते, बहिनी, असा मोठा परिवार आहे. घटना समजताच ग्रामस्थांनी स्वंयस्फूर्तीने गाव बंद ठेवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -