घरमहाराष्ट्र...तर रस्त्यावर उतरु; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे सरकारला इशारा

…तर रस्त्यावर उतरु; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे सरकारला इशारा

Subscribe

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर लॉकडाऊन वाढीवरुन चांगलेच आक्रमक झाले आहेत. सरकारने ३१ जुलैनंतर पुन्हा लॉकडाऊन वाढवल्यास रस्त्यावर येऊन विरोध करु, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. यावेळी त्यांनी गुन्हे दाखल होण्याची भीती दाखवू नका, माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते अकोले येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

“आमचा पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. त्यामुळे आता लॉकडाऊन मोडावा लागेल. दानदात्यांची क्षमता संपलेली असून आता तरी शासनाने लोकांना मदत करावी. ३१ जुलैनंतर राज्यात लॉकडाऊन वाढवू नये. अन्यथा रस्त्यावर येऊन विरोध करु. सरकार गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवत आहे. मात्र, ती भीती आम्हाला दाखवायची नाही. माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी आहे,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -

इलेक्ट्रॉनिक्स मीडिया कोरोनाबद्दल भीतीदायक बातम्या पसरवत आहे. मात्र प्रिंट मीडिया आशादायक बातम्या देत आहे,” असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. दरम्यान, सरकारच्या तिजोरीवरही भाष्य केलं. सरकार तिजोरीत पैसा नाही म्हणतं, मग टेंडर काढून कॉन्ट्रॅक्टरचे पैसे कसं देतं? असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -