घरमहाराष्ट्रकोकणी माणसाच्या पोटावर मारू नका - जठार

कोकणी माणसाच्या पोटावर मारू नका – जठार

Subscribe

नाणार प्रकल्प रद्द करून कोकणी माणसाच्या पोटावर मारू नका. या मागणीसाठी भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सांगितले आहे.

नाणार प्रकल्प रद्द करून कोकणी माणसाच्या पोटावर मारू नका असे वक्तव्य भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केले. नाणार प्रकल्प रद्द करू नका या मागणीसाठी भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीनंतर प्रमोद जठार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की जवळपास १५ जणांच्या समितीने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाणार रद्द करू नका अशी मागणी केली आहे. यावेळी माजी आमदार बाळा माने, आमदार प्रसाद लाड हे देखील यावेळी उपस्थित होते. प्रकल्प व्हावा ही अनेक जणांची मागणी आहे म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे जठार यांनी यांनी यावेळी सांगितले आहे.

काय म्हणालेत जठार

प्रकल्प व्हावा ही मागणी अनेकांची आहे. जमीन देण्यास मालक तयार आहेत पण सरकारने पॅकेज जाहीर करावे. तसेच हा प्रकल्प रद्द करून कोकणी माणसाच्या पोटावर मारू नका असे देखील त्यांनी सांगितले. तसेच माझं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील सांगणं आहे की कोकणात शिवसेनेचा तरुण देखील बेरोजगार आहे. त्यामुळे त्यांनीही नाणारला समर्थन द्यावे असे देखील त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

दरम्यान शिवसेनेच्या देखील शिष्टमंडळाने नाणारची अधिसूचना रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी याच अधिवेशनात नाणारची अधिसूचना रद्द करण्याचे आश्वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले आहेत.


हेही वाचा – नाणार प्रकल्पाचा फायदा की तोटा? पहा डॉक्यूमेंटरी

- Advertisement -

हेही वाचा – नाणार प्रकल्प जनतेवर लादणार नाही – सुभाष देसाई


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -