घरताज्या घडामोडीNawab Malik : मलिक राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार...

Nawab Malik : मलिक राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार – प्रसाद लाड

Subscribe

अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना बुधवारी ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी नेत्यांकडून आज आंदोलन करण्यात आले. मंत्रालयाबाहेर असलेल्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ महाविकास आघाडी सरकारचे नेते आंदोलन करण्यासाठी उपस्थित झाले होते. तसेच मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून आज (गुरूवार) राज्यातील काही ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. दरम्यान, नवाब मलिक राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार, असं भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीचं नातं काय आहे. हे संपूर्ण महाविकास आघाडीने पाहिलं आहे. ज्या मुंबईला उडवण्याचा कट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने रचला. त्यामध्ये मुंबईच्या अनेक आणि लाखो लोकांचा जीव गेला. या कटामध्ये आणि आरोपांमध्ये नवाब मलिक यांच्यासारख्या नेत्याचा सहभाग होता. त्यामुळे त्यांना ईडी आणि एनआएकडून अटक करण्यात आली. परंतु त्यांचं समर्थन करण्यापेक्षा जीव दिलेला बरा असं माझं स्पष्ट राजकीय मत आहे, भाजपा आमदार प्रसाद लाड म्हणाले.

- Advertisement -

भारतीय जनता पार्टी या घटनेचा आणि मलिक जोपर्यंत राजीनामा देत नाहीत. तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. या मुंबईमध्ये ज्या लाखो लोकांचा जीव गेला. त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण केली. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन सुरूच राहणार आहे. नवाब मलिकच नव्हे तर ज्या लोकांवर आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी राजीनामा दिला पाहीजे, असं लाड म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Nawab Malik : महाविकास आघाडी नेत्यांचे ईडी विरोधात गांधी पुतळ्याजवळ आंदोलन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -