Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी लॉकडाऊनचा सर्वसामान्यांना मोठा फटका, राज्यानं आर्थिक पॅकेज जाहीर करावे - दरेकर

लॉकडाऊनचा सर्वसामान्यांना मोठा फटका, राज्यानं आर्थिक पॅकेज जाहीर करावे – दरेकर

राज्य सरकारने जनतेला आर्थिक मदत केल्यास जनतेचा प्रतिकार होणार नाही

Related Story

- Advertisement -

राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत. एक प्रकारे सरकारने मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये आर्थिक समस्येची चिंता निर्माण झाली आहे. चंद्रकांत दादा असतील आमचाच पक्ष नाही तर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण त्यांनीही सांगितले की पहिली त्यांची व्यवस्था केली पाहिजे आज लॉकडाऊन करताना ज्याचे हातावर पोटावर पोट आहे त्याच्या अकाऊंटमध्ये पैसे दिले असते तर त्याला आठवडाभर दिलासा मिळाला असते. अन्नधान्य, भाजीपुरवठा, तो कामावर जाणार नाही त्याच्याकडे पैसेन नाही मग तो कशाप्रकारे उदरनिर्वाह करणार याचा विचार शासनाने करायला पाहिजे आणि ते उत्तर निश्चित झाल्यावर अशा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे होता.

भाजपने जी मागणी केली आहे तसेच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ती मागणी पुर्ण करा आणि पहिले लॉकडाऊन आणला आहे त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा करा जेणेकरुन लोकांचा प्रतिकार होणार नाही अशी काळजी सरकारने घेणे आवश्यक असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

इतर राज्यांनी आपली स्वतःची राज्याची पॅकेज दिले आहेत. उत्तप्रदेश, गुजरात या राज्यांनी कामगार, मजुर आणि भाजीपाला, शेतकऱ्यांसाठी, नाभिक समाज,रिक्षा अशा इतर समाजासाठी पॅकेज देण्यात आले आहे परंतु महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचे पॅकेज केले नाही. राज्य सरकारनेही अशा प्रकारचे पॅकेज जाहीर केले पाहिजे जेणेकरुन लोकांनी आपल्या निर्णयाला चांगला पाठिंबा देता येईल.

- Advertisement -