घरमहाराष्ट्रदादर ते पुणे शिवनेरीचा प्रवास होणार स्वस्त

दादर ते पुणे शिवनेरीचा प्रवास होणार स्वस्त

Subscribe

तिकीटासाठी आता पडणार ४४० रुपये. परिवहनमंत्री, दिवाकर रावते यांची घोषणा...

मुंबईपुणे मार्गावर धावणारी, एसटीची प्रतिष्ठीत सेवा म्हणून नावलौकीक असलेल्या शिवनेरी व अश्वमेध या बसेसच्या तिकीट दरात ८० ते १२० रुपयांपर्यंत कपात करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री, व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. कमी झालेले नवे तिकीट दर येत्या सोमवार पासून म्हणजे ८ जुलै पासून लागू होणार आहेत.

गेली १५ वर्षे मुंबईपुणे मार्गावर अत्यंत लोकप्रिय असलेली एसटीची शिवनेरीबस सेवा या मार्गावरील कोणत्याही दळणवळण सेवेपेक्षा किफायतशीर, सुरक्षित व आरामदायी आहे. सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ७ मार्गावर शिवनेरीच्या दिवसभरात ४३५ फेऱ्या केल्या जातात, याद्वारे दरमहा सुमारे दीड लाख प्रवाशांना दर्जेदार सेवा दिली जात आहे. या बस सेवेची लोकप्रियता लक्षात घेऊन, ही सेवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून जास्तीतजास्त प्रवासी संख्या वाढवणे, हा तिकीट दर कमी करण्याचा उद्देश असल्याचे श्री. रावते यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

मागील काही काळात मुंबईपुणे मार्गावर कमी दरात चालणाऱ्या ओला, उबेर सारख्या टॅक्सी सेवेमुळे शिवनेरीच्या प्रवासी संख्येवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तिकीट दर कमी केल्यामुळे हा प्रवाशी वर्ग सुद्धा शिवनेरीकडे वळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -