घरताज्या घडामोडी'त्या' 9 मंत्र्यांना अपात्र कधी करणार? विधानसभा अध्यक्षांना पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रश्न

‘त्या’ 9 मंत्र्यांना अपात्र कधी करणार? विधानसभा अध्यक्षांना पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रश्न

Subscribe

मुंबई –  राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार यांच्यासह 9 जणांनी शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील होत मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील 9 सदस्यांचे निलंबन केले आहे. तरीही विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर या 9 मंत्र्यांना अपात्र का करत नाहीत, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. विधानसभा अध्यक्ष नेमके कशाची वाट पाहत आहेत, असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.

एखाद्या पक्षातून फुटून बाहेर पडल्यानंतर त्या सदस्यांची संख्या किमान दोन तृतीयांश असेल, तर त्यांना दुसर्‍या पक्षात विलीन होणे बंधनकारक आहे, असे कायदा सांगतो. याच अर्थाने राष्ट्रवादीच्या 53 पैकी किमान 36आमदारांना दुसर्‍या पक्षात विलीन व्हावे लागेल, तेव्हाच त्यांचे निलंबन रद्द होईल. सध्या तरी राष्ट्रवादीतून फुटून बाहेर पडलेल्या अजित पवार यांच्या गटाकडे 36 आमदारांची संख्या दिसत नाहीत, असे असूनही विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांच्यावर कारवाईपासून हात आखडता घेताना दिसत आहेत, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

- Advertisement -

ठाकरे गटाच्या याचिकेवर 14 जुलैला सुनावणी?

विधानसभा अध्यक्ष अपात्र आमदारांवर निर्णय घेण्यास चालढकल करत असल्याचे म्हणत ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर 14 जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे, तर विधानसभा अध्यक्षांना शिवसेना निलंबनाबाबत 10 ऑगस्टपर्यंत निकाल द्यावा लागणार आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -