घरCORONA UPDATEपुण्यात एका रात्रीत २९२ नवीन कोरोनाबाधित रूग्ण!

पुण्यात एका रात्रीत २९२ नवीन कोरोनाबाधित रूग्ण!

Subscribe

पुणेकरांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुण्यात एका रात्रीत २९२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत ४५ हजार २६०वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ हजार २१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तर काल पुण्यात दिवसभरात १८८२ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  तर काल पुण्यात ९०६ रुग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान मागील २४ तासात कोरोनावर उपचार घेणार्‍या ७६४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

- Advertisement -

तर राज्यात गुरुवारी ८ हजार ६४१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर गुरुवारी दिवसभरात २६६ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ८४ हजार २८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राज्यात आतापर्यंत एकूण १ लाख ५८ हजार १४० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.


हे ही वाचा – ‘काँग्रेस आता म्हातारं झालय, त्यांच भवितव्य अंधारात आहे’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -