घरमहाराष्ट्रपुणेपुण्यात धावत्या सिंहगड एक्स्प्रेसवर दगडफेक; एक गंभीर जखमी

पुण्यात धावत्या सिंहगड एक्स्प्रेसवर दगडफेक; एक गंभीर जखमी

Subscribe

पुण्यातील लोणावळ्याजवळ धावत्या सिंहगड एक्स्प्रेसवर दगडफेकीची घटना समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने केलेल्या या दगडफेकीच्या घटनेत एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसवर दगडफेकीची घटना घडली. कर्जत लोणावळ्यादरम्यान ही एक्स्प्रेस आली तेव्हा अज्ञातांनी दगड भिरकावले. यावेळी दगड लागून एक प्रवासी जखमी झाला आहे. यावेळी रेल्वे स्थानकावर या प्रवाशावर उपचार करण्यात आले. रेल्वे पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरु केला आहे. हे दगड नेमकी कोणी भिरकावली त्या आरोपीला पोलीस शोध घेत आहे.

- Advertisement -

रेल्वेवर दगड भिरकावल्याचे घटना वारंवार समोर येत आहे. मात्र या घटनांवर रेल्वे पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येतेय. त्यामुळे लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करताना आपला जीव मुठीत घेऊन प्रवाशांना प्रवास करावा लागतोय. अशात काही घटना प्रवाशांच्या जीवावर बेतत आहेत. यासाठी कठोर कायदे करण्याची मागणी प्रवाश्यांकडून होत आहे.


हेच का तुमचं हिंदुत्व? सुषमा अंधारे, उद्धव ठाकरेंविरोधात मुंबईत बॅनरबाजी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -