घरमुंबईधक्कादायक! ७० वर्षीय आईचा मुलीकडून संपत्तीसाठी छळ

धक्कादायक! ७० वर्षीय आईचा मुलीकडून संपत्तीसाठी छळ

Subscribe

या प्रकरणी समतानगर पोलिस ठाण्यात पालक तसेच ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण आणि देखभाल, कायदा २००७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला ही MTNL येथे कार्यरत होती आणि त्यांचे पती हे आयकर अधिकारी होते.

कांदिवलीच्या लोखंडवाला परिसरात राहणाऱ्या एका ७० वर्षाच्या वृद्ध महिलेला मारहान करून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोखंडवाला येथील पोलिस ठाण्यात छळ झालेल्या एका सत्तर वर्षीय आईने आपल्या मुलीविरूद्ध ही तक्रार नोंदवीली आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून पीडितेचा आपल्या मुलीसोबत संपत्तीच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात पालक तसेच ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण आणि देखभाल, कायदा २००७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला ही MTNL येथे कार्यरत होती आणि त्यांचे पती हे आयकर अधिकारी होते. चार महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे छळ करत संतापाच्या भरात मुलीने जमिनीवर पाडून छातीवर बसून मारहान केल्याने डाव्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे महिलेने सांगितले आहे. काही दिवस हा वाद शमला होता त्यामुळे मी तक्रार केली नव्हती असे त्यांनी म्हटल आहे.

- Advertisement -

मात्र, मागील काही दिवसांपासून वाद पुन्हा एकदा सुरू झाला. मुलगी संपत्तीसाठी पुन्हा एकदा छळ करू लागली, यामुळे मुलगी उपाशी ठेवत असून नग्न करून मारहाण करीत असल्याचा आरोप या वृद्ध महिलेने पोलिस ठाण्यात याविरोधी तक्रार केला आहे. मुलगी आपला छळ करते ही बातमी बाहेर कोठेही जाऊ नये यासाठी मुलीने आपला मोबाईल ताब्यात घेऊन बँक पासबुक, चेकबुक, आधारकार्ड अशा सर्वच वस्तू काढून घेतल्याचे देखील तक्रार करताना त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -