घरमहाराष्ट्रपादचारी नागरिकांना लुटणारी टोळी जेरबंद

पादचारी नागरिकांना लुटणारी टोळी जेरबंद

Subscribe

पिंपरी-चिंचवड शहरात पादचारी नागरिकांना लुटणाऱ्या टोळीला पिंपरी पोलिसांनी जेरबंद केल्याप्रकरणी तीन जणांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात पादचारी नागरिकांना लुटणाऱ्या टोळीला पिंपरी पोलिसांनी जेरबंद केलं आहे. याप्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला असून विजय दत्तात्रय सरोदे, विजय म्हसू कांबळे आणि किशोर नारायण ढवळे अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १६ मोबाईल आणि १ दुचाकी असा ऐकूण १ लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज पिंपरी पोलिसांनी हस्तगत केला आहे.

१६ मोबाईलसह एक दुचाकी हस्तगत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात पिंपरी पोलीस ठाण्याचे हद्दीत हर्षल कालिदास कुंभार याला भरदिवसा पायी चालत जात असताना तिघांनी अंगावर थुंकल्याचा बहाणा करत हर्षलला बेदम मारहाण करत लुटले होते. यात मोबाईल आणि रोख रक्कम पळवली होती. परंतु, यातील एका आरोपीला नागरिकांनी पकडून चोप देत पिंपरी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. दरम्यान, त्याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आणखी दोघांची नावे समोर आली आहेत. त्यांच्याकडून १६ मोबाईल आणि एक दुचाकी हस्तगत केली असून त्याची किंमत १ लाख ८४ हजार आहे.काही दिवसांपूर्वी याच आरोपीने एका पादचारी नागरिकाला कोयत्याचा धाक दाखवून दुचाकीवर अज्ञात स्थळी नेवून लुटले होते. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. लुटी मधील मोबाईल हे ५०० ते १ हजार रुपयांना विकत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही कामगिरी पोलिस उपयुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार आणि गुन्हे पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख यांच्या पथकाने केली. यात रोहित पिंजन, उमेश वानखडे, सोमेश्वर महाडिक यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

- Advertisement -

हेही वाचा – युट्युबवरील व्हिडिओ पाहून सोनसाखळी चोरी करणारी टोळी जेरबंद

हेही वाचा – धुळ्यानजीक नामांकित मद्याची हेराफेरी करणारे दोघे जेरबंद; लाखोंचे मद्य जप्त

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -