घरमहाराष्ट्रजुन्नरच्या पिंपळवंडीत शस्त्रसाठा जप्त; एकाला अटक

जुन्नरच्या पिंपळवंडीत शस्त्रसाठा जप्त; एकाला अटक

Subscribe

जुन्नरच्या पिंपळवंडी गावात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला आहे. याप्रकरणी राजाराम अभंग याला अटक करणायात आली असून त्याजवळील शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून ठिकठिकाणी सुरक्षाव्यवस्था वाढवली असून पोलिसांची करडी नजर आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथील जुन्नरच्या पिंपळवंडी गावात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच दहशतवाद विरोधी पथकाने हा शस्त्रसाठा ताब्यात घेतला असून एका स्थानिक व्यक्तीकडे कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी पिंपळवंडी येथील अभंग वस्ती येथे राजाराम किसन अभंग (६०) याच्या शेतातील घरात हा शस्त्रसाठा सापडला आहे.

हा शस्त्रसाठा करण्यात आला जप्त

पिंपळवंडी येथील अभंग वस्ती येथे राहणारे राजाराम अभंग यांच्या घरात इलेक्ट्रिक गन तसेच पाइप बॉम्ब बनविले असून तलवार, कोयता, दोन भले आणि स्फोटक बनविण्यासाठीचे साहित्य असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार अभंग यांच्या घरावर छापा घालत हे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यामध्ये स्ट्रक्चर, इलेक्ट्रिक गन, गन पावडर तसेच एका तेलकट कागदामध्ये स्फोटकांची पावडर आढळली आहे. त्याशिवाय दोन तलवारी, दोन भाले, ५९ डिटोनेटर, इलेक्ट्रिक स्विच, इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक बॅटरी, हाताने तयार केलेले चिलखत तसेच एक हेल्मेट असे साहित्य आढळून आले आहे.

- Advertisement -

यापूर्वी ही अभंगला करण्यात आली होती अटक

अभंग हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याने २००३ मध्ये एका व्यक्तीला ठार मारण्याच्या उद्देशाने बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या स्फोटात लहान मुलांसह महिला देखील जखमी झाली याप्रकरणी अभंग याला अटक करण्यात आली होती. तो जवळपास तीन वर्ष येरवडा कारागृहात असल्याची माहिती समोर आली आहे. अभंग याचे कुटुंबीय त्याच्या सोबत राहत नाहीत. त्याचे सातवीपर्यंत शिक्षण झाले असून त्याला स्फोटके बनविण्याचे प्रशिक्षण कुठे मिळाले. तसेच कुठल्या कारणासाठी त्यांनी ही स्फोटके जवळ बाळगली याचा तपास ग्रामीण पोलिसांनी सुरू केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -