घरमुंबईम्हाडाच्या प्रयोगशाळेत पाणी तपासणी शक्य

म्हाडाच्या प्रयोगशाळेत पाणी तपासणी शक्य

Subscribe

आतापर्यंत फक्त बांधकामाशी संबंधित मटेलिअल तपासणी होणार्‍या म्हाडाच्या प्रयोगशाळेत येत्या काही दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याची तपासणी करणे शक्य होणार आहे. म्हाडा प्रयोगशाळेचे आयएसओ मूल्यांकन वाढवण्याच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होईल. सध्याच्या प्रयोगशाळेचे आधुनिकीकरण करूनच ही गुणवत्ता वाढविण्यात येणार आहे. खाजगी कंपन्या तसेच रिअल इस्टेट सेक्टरला आकर्षिक करणे हेदेखील या प्रयोगशाळेचे उद्दिष्ट असेल.

म्हाडाला कोट्यावधी रूपयांचा महसूल देणार्‍या विभागामध्ये प्रयोग शाळेचा समावेश आहे. सध्या म्हाडाच्या लॅबचे आयएसओ 9001 : 2008 हे मानांकन आहे. पण सध्याच्या लॅबचे आधुनिकीकरण करताना हे मानांकन आयएसओ 9001 : २०१५ पर्यंत वाढवण्याचा म्हाडाचा प्रयत्न असणार आहे. सध्या प्रयोगशाळेत असणार्‍या उपकरणांचे ऑटोमायजेशन करणे हा लॅबच्या आधुकिकीकरणाचा एक महत्वाचा टप्पा आहे. ऑटोमायजेशनमुळे सध्याच्या लेखी नोंदी स्वरूपातील आकडेवारी ही डिजिटल स्वरूपात उपलब्ध होईल.

- Advertisement -

खुद्द म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी लॅबच्या आधुनिकीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यातील इतर आदर्श प्रयोगशाळांच्या तोडीसतोड अशा म्हाडाच्या गुणवत्तापूर्ण लॅबची उभारणी करण्यात येईल, असे म्हैसकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे म्हाडाचे कर्मचारी आणि अधिकारी हे अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळांसोबतच राज्यातील आणखी प्रयोगशाळांचा दौराही करणार आहेत. सध्या म्हाडाच्या मुंबई दुरूस्ती मंडळ, झोपडपट्टी दुरूस्ती मंडळ, कोकण मंडळ यांच्यामार्फत बांधकामाचे मटेरिअल तपासण्यात येते. म्हाडा प्रयोगशाळेतून प्रशासनाला २ कोटी ते ३ कोटी रूपयांचा महसूल मिळतो. त्यामुळेच अद्ययावत तसेच अतिशय गुणवत्तापूर्ण सेवा पुरवणारी लॅब विकसित करावी असे म्हाडाच्या उपाध्यक्षांचे म्हणणे आहे. आएसओ मानांकन वाढल्यावर तसेच गुणवत्तापूर्ण सेवा सुरू झाल्यावर नक्कीच खाजगी कंपन्याही ही सेवा मिळवण्यासाठी प्रयोगशाळेत येतील, असा विश्वास म्हाडाच्या प्रयोगशाळेतील वरिष्ठ अभियंत्यांनी व्यक्त केला.

कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय संपूर्ण प्रयोगशाळेचे कामकाज हे आता ऑनलाईन पद्धतीने चालणार आहे. प्रयोग शाळेच्या कामकाजात ऑनलाईन प्रणालीचा केलेला समावेश हा आयएसओ मानांकन वाढवण्याच्या दृष्टीने केलेला प्रयत्न आहे. येत्या दिवसांमध्ये लॅब प्रशस्त तसेच लॅबचे इंटेरिअरही दर्जेदार करण्यात येणार आहे. ऑनलाईन प्रणालीमुळे म्हाडाकडे १ कोटी रूपयांचा जीएसटी रखडण्यासारखी प्रकरणेही कमी होऊ शकतील, असाही विश्वास त्या अभियंत्यांनी व्यक्त केला. आयएसओ मानांकन वाढवण्यासाठी एका सल्लागाराची मदत घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी याआधीची डेडलाईन १ एप्रिल होती. पण काही कारणामुळे ही डेडलाईन आता मागे पडली आहे. त्यामुळेच येत्या दोन ते तीन महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास अभियंत्यांना वाटतो. म्हाडा प्राधिकरणासमोर या संपूर्ण आधुनिकीकरणाच्या प्रकल्पाच्या खर्चाचा प्रस्ताव प्रलंबित आहे.

लवकरच डिजिटल रिडिंग
म्हाडाच्या प्रयोगशाळेत सध्या सिमेंट, रेती, स्टील, पेव्हर ब्लॉक, विटा यासारख्या बांधकामाचे मटेरिअल तपासणीसाठी येत असते. पण सध्या प्रयोगशाळेत होणार्‍या सगळ्या चाचण्यांच्या नोंदी या मॅन्युअल पद्धतीने म्हणजे लिखित स्वरूपात घेण्यात येतात. लवकरच या सगळ्या उपकरणातून डिजिटल रिडिंग घेण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. म्हाडाच्या माहिती आणि तंत्रज्ञान कक्षाच्या मदतीने ही सगळी डिजिटल रिडिंग सॉफ्टव्हेअरशी जोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रयोगशाळेमधील कामकाज हे जलद होतानाच अधिक पारदर्शक होण्यासाठी मदत होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -