घरमुंबईआज हिंदुत्वाचा गजर आणि नंतर विसर आता तरी होऊ नये - उद्धव...

आज हिंदुत्वाचा गजर आणि नंतर विसर आता तरी होऊ नये – उद्धव ठाकरे

Subscribe

आज निवडणुकीत हिंदुत्वाचा गजर व निवडणुका संपल्यावर विसर असे निदान आता तरी घडू नये अशी अपेक्षा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज समनामधून केली आहे.

आज निवडणुकीत हिंदुत्वाचा गजर व निवडणुका संपल्यावर विसर असे निदान आता तरी घडू नये अशी अपेक्षा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज समनामधून केली आहे. हिंदुत्वाची गर्जनाच देशाला सुरक्षेची कवचकुंडले देईल. २०१४ सालीही मोदी यांच्या मागे ‘हिंदू’ समाज उभा राहिला आणि २०१९ सालीही हिंदू समाज मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीस विजयाच्या शिखरावर नेईल अशा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. वर्धा येथे झालेल्या पहिल्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले. या मोदींच्या भूमिकेचे शिवसेनेकडून आज सामना मधून स्वागत करण्यात आले आहे. शिवसेनेचा श्वास व आत्मा ‘हिंदुत्व’ हाच असल्याने आम्ही मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करीत आहोत असे देखील ते यावेळी म्हणालेत.

काय आहे अग्रलेखात 

हिंदुत्वाची गर्जनाच देशाला सुरक्षेची कवचकुंडले देईल. तेव्हा आज निवडणुकीत हिंदुत्वाचा गजर व निवडणुका संपल्यावर विसर असे निदान आता तरी घडू नये. २०१४ सालीही मोदी यांच्या मागे ‘हिंदू’ समाज उभा राहिला आणि २०१९ सालीही हिंदू समाज मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीस विजयाच्या शिखरावर नेईल. त्या दृष्टीने वर्धा येथे प्रचारसभांचा मुहूर्त करताना पंतप्रधान मोदी यांनी जे हिंदुत्वाचे कार्ड आक्रमकपणे फेकले ते महत्त्वाचेच ठरते. शिवसेनेचा श्वास व आत्मा ‘हिंदुत्व’ हाच असल्याने आम्ही मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करीत आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -