घरमहाराष्ट्रपुणेHeavy Rain in Pune: पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

Heavy Rain in Pune: पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

Subscribe

पुण्यातील कोथरुड परिसरात पावसाची धुव्वाधार बॅटींग सुरु आहे. विजांचा कडकडाटदेखील सुरु आहे. खडकवासला परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. खडकीत वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. औंध, बोपोडी, सकाळनगर, पाषाण, सुसरस्ता येथे मुसळधार पावासाला सुरुवात झाली आहे.

पुणे शहरात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह गुरुवारी पावसाने हजेरी लावली. राज्यात मागचे दोन दिवस ऊन वाढलं होतं. अनेक ठिकाणी तापमान चाळिशीपार गेलं होतं. मात्र, महाराष्ट्र, दक्षिण कोकणात वादळी पावसासह गारपीट तर उर्वरित राज्यातही वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार आता पुण्यात पावसाला सुरुवात झाली आहे.(  Heavy Rain in Pune Aundh, Bopodi, Sakalnagar, Pashan, Susarsta )

पुण्यातील या भागांत पावसानं झोडपलं

पुण्यातील कोथरुड परिसरात पावसाची धुव्वाधार बॅटींग सुरु आहे. विजांचा कडकडाटदेखील सुरु आहे. खडकवासला परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. खडकीत वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. औंध, बोपोडी, सकाळनगर, पाषाण, सुसरस्ता येथे मुसळधार पावासाला सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

मागच्या चार-पाच दिवसांपासून पुण्यात ढगाळ वातावरण आहे. दिवसा प्रचंड गरमी होत असून, सायंकाळनंतर पाऊस हजेरी लावत आहे. मंगळवारपासून शहरातील कमाल तापमानाचा आकडा चाळीशीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे घराबाहेर पडल्यानंतर उन्हाच्या झळ्या अंगाला झोंबत होत्या. तसेच, किमान तापमानही 20 अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही झाली.

सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आकाश भरुन आले आणि ढगांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. पुढील पाच दिवस अजून दुपारी आकाश निरभ्र असेल आणि सायंकाळनंतर हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार आज पावसाने हजेरी लावली. गुरुवार सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. तसेच, पावासाची चिन्हेही दिसू लागली होती. नंतर सायंकाळी 6:30 च्या सुमारास पावासाला सुरुवात झाली.

- Advertisement -

( हेही वाचा: पती गमाविलेल्या महिलांसाठी ‘गंगा भागिरथी’ हा निर्णय घाईघाईत; तत्काळ निर्णय मागे घ्या- सुप्रिया सुळे )

मुंबईतही पावासानं झोडपलं

वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह बुधवारी (12 एप्रिल) मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडली, तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, विलेपार्ले परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अंधेरीतील मरोळमध्ये जोरदार वाऱ्यामुळे बऱ्याच घरांचे पत्रे उडून गेले आहेत. मुंबई एअपोर्ट परिसरात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -