घरमहाराष्ट्रजरांगे पाटलांच्या सभेवर भुजबळांकडून प्रश्नचिन्ह; प्रकाश आंबेडकरांनी दिला इशारा, राग समजून घ्या...

जरांगे पाटलांच्या सभेवर भुजबळांकडून प्रश्नचिन्ह; प्रकाश आंबेडकरांनी दिला इशारा, राग समजून घ्या नाहीतर…

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यातील राजकीय वाद कायम चर्चेचा विषय असतो. मात्र हे दोन्ही नेते आज (21 ऑक्टोबर) मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये एकत्र आले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन्ही नेत्यांमध्ये भेटही घडवून आणली आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांना मराठ आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या सुरू असलेल्या वादावर प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे. (Question marks from Bhujbal on meeting of Jarange Patil Prakash Ambedkar warned understand anger or else)

हेही वाचा – वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार अन् प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट; चर्चांना उधाण

- Advertisement -

प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या लढाईसंदर्भात राज्य सरकारला इशारा दिला आहे. शासनाने जरांगे पाटलांशी इमानदारीने बोलावं. त्यांना चार महिने, दोन महिने मुदत देत राहू नये. कुणी बोलत नाही, पण शासनाला सांगतो की, त्यांच्या गावातील 20-25 वर्षांच्या तरुणांच्या हाताला कामं नाही. त्यांची लग्न झालेली नाहीत. या वर्गाच्या कौटुंबिक समस्याही निर्माण झाल्या आहेत, व्यक्तिगत समस्या आहेत. या वर्गाचा जरांगे पाटलांना पाठिंबा आहे. मी ते अनुभवलं आहे. मी एकदा पाच-सहा ठिकाणी बोलणीला गेलो होतो. मुलीचे आईवडील आतल्या खोलीत घेऊन जायचे. नोकरीला लावणार का असं विचारायचे. शब्द दिला तरच लग्न जुळायचं, नाही तर लग्न जुळत नाही. या सामाजिक परिस्थितीचं भान राज्यकर्त्यांना आलं असेल असं वाटत नाही. त्यामुळे जरांगे पाटलांची फसवाफसवी थांबवा, नाही तर सरकारवरच उलटेल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

जरांगे पाटील यांच्या नावाने वादळ उभं राहिलं

आरक्षण आणि जातगणनेचा संबंध नाही, हे बिहारच्या जातगणनेतून बाहेर आलं आहे. ते म्हणजे कोणतीही जात प्रबळ नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एवढी वर्ष प्लॅनिंग होऊनही आर्थिक दृष्टीकोणातून बदल झालेला नाही. राज्यातील जनगणना झाली तर इकॉनॉमिक असमतोल वाढला असल्याचं दिसून येईल. त्यामुळे सरकारने त्यावर लक्ष दिलं पाहिजे. तसेच जरांगे पाटील यांच्या नावाने वादळ उभं राहिलं आहे. त्यांनी प्रामाणिक राहावं नाही तर परिणाम होतील, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटलांना दिला.

- Advertisement -

हेही वाचा – Winter Session: राज्याचं हिवाळी अधिवेशन अवघ्या 10 दिवसांत गुंडाळणार? तात्पुरतं वेळापत्रक जाहीर

भुजबळांना केली विनंती 

छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांच्या सभेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यासंदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जरांगे पाटील यांना शेतकऱ्यांनी स्वत:हून सभेसाठी शेती दिली होती. दीडशे एकर शेतीतील पिकं नष्ट करण्यात आलं होते. हा शेतकऱ्यांचा निर्णय होता. त्यांना भरपाई मिळालेली नाही. काही जणांनी राहण्याची जेवण्याची सोय केली. याला अदृश्य म्हणाल तर अदृश्य आहे, पण ते ठरवून नाही तर उत्स्फूर्त आहे. फडणवीस यांनी भुजबळांच्या माध्यमातून सभेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. फंडिंग कोण करतं? असा सवाल केला आहे. भुजबळांना विनंती आहे तुमचंही ते बाहेर काढतील. राग समजून घ्या नाही तर तुमच्यावर उलथेल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -