घरCORONA UPDATECoronavirus: आर. आर. पाटील यांचा मुलगा आणि भावाला कोरोनाची लागण

Coronavirus: आर. आर. पाटील यांचा मुलगा आणि भावाला कोरोनाची लागण

Subscribe

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला असून त्यांचा मुलगा रोहित आणि आबांचा भाऊ सुरेश पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या दोघांचीही प्रकृती ठिक असल्याचे सांगितले जात आहे. तसेच आबांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे रोहित पाटील हे काल तासगाव येथील एका कोविड उपचार केंद्राच्या उदघाटनासाठी गेले होते. या उदघाटनाला पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील देखील उपस्थित होते. आता रोहित पाटील यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या इतर नेत्यांनाही खबरदारीचा उपाय सुचवण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार १९५ कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले असून त्यापैकी ८ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ६ हजार ७३० रुग्ण अद्याप उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत ४६० रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यातील मोठे नेते माजी मंत्री आणि भाजपचे आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, विधानपरिषदेचे आमदार मोहनराव कदम, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार संभाजीराव पवार यांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे. त्यात आता कवठे महंकाळ येथील महाराष्ट्राचे परिचित नेते स्व. आर. आर. आबा पाटील यांचे सुपुत्र आणि त्यांचे भाऊ देखील कोरोनाच्या कचाट्यात अडकले आहेत. गुरुवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -