घरताज्या घडामोडीसंतापजनक! चॉकलेट आणायला गेलेल्या मुलीवर नराधमाने केला बलात्कार!

संतापजनक! चॉकलेट आणायला गेलेल्या मुलीवर नराधमाने केला बलात्कार!

Subscribe

दिवसेंदिवस मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दररोज एक घटना ऐकायला येते. नुकतीच उत्तर प्रदेशमध्ये अशीच एक घटना घडली आहे. दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील गौतम बुध नगर जिल्ह्यात एका निर्दोष मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. बुधवारी ही घटना घडली. ही मुलगी चॉकलेट आणण्यासाठी दुकानात गेली. दुकानातून परत येत असताना आरोपीने या मुलीवर बलात्कार केला.

नोएडाच्या एच्छर बाजाराजवळ राहणारी मुलगी घराच्या जवळील दुकानात चॉकलेट आणण्यासाठी गेलीय ती परत येत असताना आरोपीने मुलीला जबरदस्तीने आपल्या खोलीकडे खेचत आणले आणि तिच्यावर बलात्कार केला. नंतर त्याने मुलीला धमकावले आणि सांगितले की तिने याविषयी कोणाला सांगितले तर तो तिला मारून टाकेल.

- Advertisement -

या घटनेनंतर घाबरलेल्यी ती मुलगी रडत आपल्या घरी आली. तीने घरी घडलेला सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. आपल्या मुलीवर बलात्कार झाल्याचे समजताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांने मुलीला घेऊन तातडीने पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी पीडित मुलीवर वैद्यकीय उपचार केले आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.


हे ही वाचा – पिझ्झ्याच्या दुकानात नोकरीचा अर्ज घेऊन आला आणि टिप बॉक्स घेऊन पळाला!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -