घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील 'या' भागात होणार पाऊस; जाणून घ्या पुढील पाच दिवस कसं राहणार...

महाराष्ट्रातील ‘या’ भागात होणार पाऊस; जाणून घ्या पुढील पाच दिवस कसं राहणार हवामान?

Subscribe

राज्यात सध्या वातावरणात थंडी वाढत आहे. तर दुपारी उन्हाचे चटकेही जाणवत आहेत. दक्षिण भारतात काही ठिकाणी पावसाच्या सरीही पडत आहेत.

मुंबई: राज्यात सध्या वातावरणात थंडी वाढत आहे. तर दुपारी उन्हाचे चटकेही जाणवत आहेत. दक्षिण भारतात काही ठिकाणी पावसाच्या सरीही पडत आहेत. (Rain will occur in this area of Maharashtra Know how the weather will be for the next five days)

राज्यात सध्या सकाळी हवेत गारवा जाणवत आहे. अनेक भागात थंडी वाढल्याचं दिसतं. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तसंच, नोव्हेंबर महिन्यात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. यासोबतच गोवा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर परिसरात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

राज्यात झालेल्या या हवामान बदलामुळे काही भागात पाऊस होणार आहे. गोवा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस होईल. यासोबतच केरळ आणि तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळच्या समुद्र किनाऱ्यालगत अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस होणार आहे. यासोबतच राज्यात तापमानातदेखील वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच, पुढील काही दिवसांत सिंधुदूर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. पण जोरदार पावसाची शक्यता नसल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीच्या नजीक वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यानं गोवा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर परिसरातील हवेत बाष्पाचे प्रमाण वाढून हवा दमट झाली आहे. त्यामुळे या परिसरात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

- Advertisement -

श्रीलंका आणि शेजारच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थितीत समुद्रसपाटीपासून 3.6 किलोमीटर उंचीवर आहे. पश्चिमी विक्षोप समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर आहे. तसंच बंगालच्या उपसागराकडून दक्षिण भारताकडे जोराचे वारे वाहत आहेत. या कारणांमुळे पुढील सात दिवस दक्षिण भारतात हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज आहे. तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात पुढील तीन दिवस पाऊस पडू शकतो. तर कर्नाटकच्या दक्षिण भागात 3 आणि 5 नोव्हेंबरला पावसाची शक्यता आहे, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

(हेही वाचा: ‘व्हीआयपी कल्चर आम्हाला मान्य नाही’; ‘त्या’ प्रकरणावर श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -