घरमहाराष्ट्रराज ठाकरे पोहचले आपल्या आजोळी

राज ठाकरे पोहचले आपल्या आजोळी

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ५ दिवसांच्या अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यात राज ठाकरे यांनी जिल्ह्यातील परतवाडा येथील आपल्या आजोळी आज भेट दिली. राज ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांच्या आजी रमाबाई ठाकरे हे १९२६ ते १९३२ या काळात अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील ज्या घरात वास्तव्य करत होते त्याच घरात आज राज ठाकरे यांनी स्वतः भेट दिली आणि जुन्या आठवणी ताज्या केल्या. ज्या घरात प्रबोधनकार ठाकरे वास्तव्य करत होते ती जागा आजही तशीच डोलाने उभी आहे.. त्या काळातले घर मालक जे होते त्यांचे नातू यांनी राज ठाकरे यांच्याकडे याजागी बाळासाहेब ठाकरे याचं मोठ स्मारक व्हावे अशी मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी ती लगेच मान्यही केली. मनसे अध्यक्ष हे मागील चार दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात आहे. आज ते मेळघाट वरून परत अमरावती जात असतांना त्यांनी परतवाडा येथील आपल्या आजी-आजोबांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी बाळा नांदगावकर सुद्धा हजर होते. उद्या राज ठाकरे अमरावतीहून आपल्या यवतमाळच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -