घरताज्या घडामोडीMonsoon 2022 forecasts: यंदाचा मॉन्सून कसा ? स्कायमेटच्या अहवालात कुठे पाऊस अधिक,...

Monsoon 2022 forecasts: यंदाचा मॉन्सून कसा ? स्कायमेटच्या अहवालात कुठे पाऊस अधिक, कुठे कमी ?

Subscribe

स्कायमेटने येत्या दिवसांमधील मॉन्सून २०२२ साठीचा अंदाज मांडला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी यंदाचा मॉन्सून सामान्य असेल असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. साधारणपणे ९८ टक्के इतक्या प्रमाणात मॉन्सूनचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण यंदाच्या मॉन्सूनवर ला निना, अल निनो यासारख्या वादळांचा परिणाम नसेल, असेही स्कायमेटने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मॉन्सून कालावधीत अडथळा ठरणाऱ्या अल निनोचा परिणाम यंदाच्या मॉन्सूनवर होणार नाही, असेही स्कायमेटच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश पाटील यांनी स्पष्ट केले की, गेल्या २ वर्षातील मॉन्सूनचा कालावधीवर हा लागोपाठ आलेल्या ला नीनाच्या घटनांचा परिणाम राहिला. ला नीनाचा परिणाम हिवाळ्यात कमी झाला झाला. मॉन्सून कालावधीत अडसर ठरणाऱ्या अल नीनोचा परिणाम यंदाच्या मॉन्सूनवर नसेल असेही त्यांनी स्पष्ट केले. यंदाच्या मॉन्सूनमध्ये अचानक आणि अतिवृष्टी होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

- Advertisement -

देशात कुठे कसा मॉन्सून ?

यंदाच्या मॉन्सून कालावधीत राजस्थान, गुजरात या राज्यांसह पूर्व भारतात नागालॅंड, मणीपूर, मिजोरम, त्रिपुरा या भागात कमी पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. त्यासोबतच कर्नाटक आणि केरळमध्ये जुलै तसेच ऑगस्ट या कालावधीत कमी पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. तर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तर भारतातील कृषी क्षेत्र, महाराष्ट्र, मध्य प्रदेश येथे सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडण्याचे संकेत आहेत. मॉन्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जूनच्या सुरूवातीच्या महिन्यात मॉन्सून चांगल्या पद्धतीने सुरूवात करू शकतो.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -