घरमहाराष्ट्रAmravati Shiv Sainik : राज ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची जागा घेणार;...

Amravati Shiv Sainik : राज ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची जागा घेणार; खासदार नवनीत राणांचा दावा

Subscribe

आज शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. शेकडो शिवसैनिक राणा यांच्या घराबाहेर आंदोलन करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले. तसेच राज ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची जागा घेणार असा दावा त्यांनी केला.

यावेळी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, माजी महापौर किशोरी पेडणेकर चांगलं म्हणाल्या होत्या की, मुख्यमंत्र्यांची जागा आता राणा घेणार आहेत. पण मला वाटते राज ठाकरे उद्धव ठाकरेंची जागा घेणार यात काही दुमत नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांची विचार धारा सोडली. पण बाळासाहेबांचे प्रतिक म्हणून राज ठाकरेंमधून पाहतोय. बाळासाहेबांची शिकवण त्यांनी सोडली नाही. ही शिकवण धरून ते लढत आहेत संघर्ष करत आहेत ज्यापद्धतीने बाळासाहेबांनी संघर्ष केला. महाराष्ट्रात बाळासाहेबांना मानणारे त्यांच्या विचार धारेवर चालणार आहे आणि ही विचार धारा आमच्या डोक्यात आहे. जर आपल्या पदासाठी आणि लालसेपोटी कोण ही विचारधारा विसरत असेल तर त्यांना आठवण करून देण्यासाठी जे होईल ते आम्ही करू. जे लोक म्हणत आहेत मुंबईत येऊन दाखवा. पायावर आले तर पायावर जाऊ देणार नाही. पण आम्ही शांततेच्या मार्गाने देवाचे नाव स्मरण करण्यासाठी अमरावतीच्या शिवसैनिकांना आणि पोलीस विभागाला आवाहन करते की, जर कोणी देवाचे नाव स्मरण करण्यासाठी चाललं आहे तर त्यांना थांबवू नये, त्यांना येऊ द्या.

- Advertisement -

बाळासाहेबांनी पदासाठी कधी काम केलं नाही, हिंदू मतांची विचारधारा घेऊन लोकांमध्ये राहिले. त्यांच्यासाठी लढले. जीवाचं रानं केल आणि नेहमी दुसऱ्यांना मुख्यमंत्री कसं बनवता येईल, यासाठी प्रयत्न केले, तसेच त्यांच्या विचारधारेवर चालणाऱ्यांचे समर्थन केले, ते बाळासाहेब होते.

धर्माच्या प्रचार, प्रसारासाठी रवी राणा अथवा माझ्याविरोधात मुर्दाबादचे नारे देत असतील तर मी मुर्दाबाद आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला दिलेली विचारधारा महाविकास आघाडी सरकार निर्माण झाल्या त्यावेळीच संपली का? त्यानंतर लालसेपोटी उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री बनले का? काल मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसेचे पठण केले नाही त्यावरूनचं शिवसेनेने आपली विचारधारा सोडल्याचे स्पष्ट झाले.


मुख्यमंत्र्यांना हनुमान चालिसा पठणाचे आव्हान; अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिक आक्रमक

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -