घरताज्या घडामोडीSouth Africa Flood : दक्षिण आफ्रिकेत महापुराचा कहर, पुरामुळे ४०० लोकांचा मृत्यू,...

South Africa Flood : दक्षिण आफ्रिकेत महापुराचा कहर, पुरामुळे ४०० लोकांचा मृत्यू, तर ४० हजार लोकं बेघर

Subscribe

दक्षिण आफ्रिकेत महापूर आल्यामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. आफ्रिकेतील डर्बन शहर आणि पूर्वेकडील क्वाझुलु-नाताल प्रांतात अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. त्यामुळे या महापुरात ४०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ४० हजार लोक बेघर झाल्याची माहिती मिळाली आहे.

दक्षिण-पूर्व किनारपट्टीवरील डर्बन शहराच्या काही भागात पाणी शिरले. त्यामुळे रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. या पुरात रुग्णालय-घरे उद्ध्वस्त झाली असून काही लोकं या पाण्यात वाहून गेली आहेत. इथाक्विनीचे महापौर मॅकिलोसी कुंडा यांनी गुरुवारी सांगितले की, डर्बन आणि आसपासच्या इथाक्विनी महानगर क्षेत्रात सुमारे ५२ दशलक्ष डॉलरचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

- Advertisement -

येथील सरकारने याबाबत माहिती देताना सांगितले की, या आपत्तीमुळे मृतांची संख्या ३९८ वर पोहोचली आहे. तर २७ लोकं बेपत्ता झाले आहेत. तसेच ४० हजारांहून अधिक लोक बेघर झाल्याची माहिती सुद्धा सरकारने दिली आहे. घरांमध्ये अडकलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. बचाव पथकाच्या म्हणण्यानुसार, डर्बन जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या एका कुटुंबातील १० सदस्यांपैकी एकाचाही अद्याप शोध लागलेला नाहीये.

पुरामुळे विविध शाळांमधील सुमारे १८ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री अँजी मोशेगा यांनी दिली. डर्बन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसच्या प्रवक्त्याने सांगितले की, महापुर आल्यानंतरच्या सहा दिवसानंतर जिवंत राहिलेल्या मुलांचा शोध घेणं अतिशय कठीण आहे. कारण येथील लोकं त्यांच्या बेपत्ता झालेल्या नातेवाईकांना शोधण्यासाठी भटकत आहेत. ही सर्व भीषण परिस्थिती पाहिली असता सरकारने मदतीसाठी ६८ दशलक्ष निधी जाहीर केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : IPL 2022: गुजरात टायटन्सवर विजय मिळवण्यासाठी धोनी झाला फिरकीपटू, नेट प्रॅक्टिस करतानाचा Video व्हायरल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -