घरताज्या घडामोडीRaj Thackeray : राज ठाकरेंनी केली अयोध्या दौऱ्याची घोषणा, तारीखसुद्धा ठरली

Raj Thackeray : राज ठाकरेंनी केली अयोध्या दौऱ्याची घोषणा, तारीखसुद्धा ठरली

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्याची चर्चा होती. या चर्चांना राज ठाकरे यांनी स्वतःच पूर्णविराम दिला आहे. जून महिन्याच्या ५ तारखेला अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच संभाजीनगरमध्ये १ मे रोजी जाहीर सभा घेणार असल्याची दुसरी घोषणासुद्धा राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. तसेच वेळ आल्यास योग्य उत्तर देणार अशी प्रतिक्रिया विरोधकांच्या टीकेवर दिली आहे. ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम पाळला गेला नाही तर जशास तसे उत्तर देऊ यासाठी देशातील हिंदुंनी तयारीत राहावे असे जाहीर आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली होती. खास दोन मोठ्या घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राज ठाकरेंनी पत्रकार परिषद सुरु झाल्यावर दिली आहे. तसेच राज्यात सुरु असलेल्या मशिदींच्या भोंग्यांवरील वादावरही त्यांनी भाष्य केलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, मला घोषणा करायच्या होत्या यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. १ मे महाराष्ट्र दिनी संभाजीनगर तिथल्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा घेणार आहे. तसेच ५ जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह आयोध्येला जाणार आहे. त्याच्यामुळे ५ तारखेला अयोध्येत जाऊन दर्शन घेणार अशी घोषणा राज ठाकरेंनी केली आहे.

- Advertisement -

योग्य वेळी बोलणार

ते बोलले की आम्ही बोलायचे आणि आम्ही बोललो की ते बोलणार, त्याच्यामुळे योग्यवेळी बोलणार आहे. देशातील सर्वांना माझं एवढंच सांगणं आहे की, लोकांना वाटतंय भोंग्यांचा विषय हा धार्मिक आहे. परंतु धार्मिक नसून हा सामाजिक विषय आहे. त्याच्याकडे त्या अंगाने पाहणं आवश्यक आहे. आता मला कल्पना नाही यामध्ये कोण व्यक्ती आहे. परंतु इथे मुस्लिम पत्रकार आहेत ते बाळा नांदगावकर यांना भेटले आणि त्यांनी सांगितले माझं लहान मुल जेव्हा जन्माला आले त्याच्यानंतर सकाळच्या अजान आणि बांग दिल्या जात होत्या. तेव्हा मी स्वतः मशिदीमध्ये जाऊन सांगितले की, माझं मुल लहान आहे तुमचा गोंगाट बंद करा त्याच्यामुळे हा विषय फक्त हिंदूंना त्रास होतोय असा भाग नाही याचा त्रास मुस्लिम लोकांनाही होत आहे.

मुस्लिमांना काही गोष्टी समजल्या पाहिजेत

मुस्लिमांना काही गोष्टी या समजल्याच पाहिजेत. या देशा पेक्षा धर्म मोठा नाही. देशातील कायद्यापेक्षा आणि सुप्रीम कोर्टापेक्षा यांना स्वतःचा धर्म म्हणून भोंगे मोठे वाटत असतील तर यांना जशास तसे उत्तर देणं गरजेचे आहे.

- Advertisement -

मशिदीवरील भोंगे अनधिकृत वाटत नाही मग…

सर्व मशिदीवरील भोंगे अनधिकृत आहेत. ते काढले जात नाहीत. मग आमच्या लोकांनी केलेल्या गोष्टी अनधिकृत कशा मानल्या जात आहेत. त्या भोंग्यांना परमीट देऊ नका असे राज ठाकरे म्हणाले आहेत.


हेही वाचा : शांतता भंग करण्याची इच्छा नाही पण ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम पाळा, राज ठाकरेंचा पुन्हा इशारा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -