घरमहाराष्ट्रराज ठाकरे हे बाळासाहेबांचे पुतणे, वारसदार नाही : रामदास आठवले

राज ठाकरे हे बाळासाहेबांचे पुतणे, वारसदार नाही : रामदास आठवले

Subscribe

गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'मशिदींवरचे अजानचे भोंगे हटवले नाहीत तर त्यांच्यापुढे मोठ्या आवाजात मंदिरांवर हनुमान चालिसा लावला जाईल', असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली

गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मशिदींवरचे अजानचे भोंगे हटवले नाहीत तर त्यांच्यापुढे मोठ्या आवाजात मंदिरांवर हनुमान चालिसा लावला जाईल’, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) रामदास आठवले यांनीही भाष्य केलं आहे.

“कोणाला मंदिरांवर लाऊडस्पीकर लावायचा असेल तर हरकत नाही. काही मंदिरांवर लाऊडस्पीकर आहेत. त्यामुळं मशिदीवर जे त्यांचे परंपरागत लाऊडस्पीकर लावलेले आहेत. ते लावतायत म्हणून आम्ही लावू अशी भूमिका घेणं योग्य नाही. पूर्वीपासून ज्या ठिकाणी भोंगे आहेत, ते तिथे आहेत, मंदिरांवरही लाऊडस्पीकर असल्याचं आम्ही पाहिलं आहे. त्यामुळं विरोधाला विरोध करण्याची भूमिका योग्य नाही.”

- Advertisement -

“राज ठाकरे हे एका पक्षाचे मुख्य नेते आहेत. ते बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत, पण ते त्यांचे वारसदार नाहीत. बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार उद्धव ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे वारसदार असूनही आमच्यासोबत येत नाहीत, याचा आम्हाला खेद आहे”. असं रामदास आठवले यांनी म्हटलं.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

- Advertisement -

“कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा”, असं राज ठाकरे आपल्या भाषणात बोलले होते.


हेही वाचा – माझ्यावर राजकीय सुडबुद्धीनं कारवाई; प्रवीण दरेकरांचा ‘मविआ’ सरकारवर आरोप

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -