घरताज्या घडामोडीशरद पवारांच्या घरावरील हल्ल्यात आरोपी चंद्रकांत सूर्यवंशीची एन्ट्री, सदावर्तेंच्या संपर्कात असल्याचा प्रदीप...

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यात आरोपी चंद्रकांत सूर्यवंशीची एन्ट्री, सदावर्तेंच्या संपर्कात असल्याचा प्रदीप घरतांचा दावा

Subscribe

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थान सिल्व्हर ओकवर हल्ला केला होता. या हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केले असून त्यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपली आहे. त्यांच्या पोलीस कोठडीवर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यावेळी पोलिसांनी चौकशीसाठी कोठडी वाढवून देण्याची मागणी कोर्टात केली आहे. तसेच या प्रकरणात चंद्रकांत सूर्यवंशी यांचा उल्लेख करत सदावर्तेंनी हल्ल्याचा कट रचला असल्याचा दावा पोलिसांनी रिमांड रिपोर्टमध्ये केला आहे. तसेच सदावर्तेंनी नागपूरमध्ये एका व्यक्तीला फोन केला होता. या व्यक्तीचे नाव अद्याप स्पष्ट करण्यात आले नसून तपास झाल्यानंतर नाव जाहीर करु असे पोलिसांनी कोर्टात सांगितले आहे. दरम्यान आरोपी चंद्रकांत सूर्यवंशी फरार असल्याचे कोर्टात सांगण्यात आले आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत वाढ होणार की, जामीन मिळणार हे सुनावणीनंतर स्पष्ट होणार आहे. परंतू त्यापूर्वीच अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नवीन खुलासे केले आहेत. ६ एप्रिलला एक बैठक झाली होती. या बैठकीमध्ये हल्ला करण्याचे षडयंत्र रचण्यात आले. अभिषेक पाटील नावाचा कर्मचारी सदावर्ते यांच्या संपर्कात आहेत. हा कर्मचारी आरोपी देखील आहे. हल्ल्याच्या वेळी काही यूट्यूब चॅनलच्या पत्रकारांना देखील बोलवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एमजेटी नावाच्या यूट्यूब चॅनलचे पत्रकार चंद्रकांत सूर्यवंशी हे सदावर्तेंच्या संपर्कात होते. सदावर्तेंच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना हल्ल्याच्या बाबत सगळी माहिती ज्ञात होती. सदावर्तेंच्या फोन चॅटची माहिती घेण्यात आली आहे. सदावर्तेंनी एका चॅटमध्ये प्लॅनबद्दल सांगितले आहे. सगळ्या आंदोलनाचा मास्टरमाईंड कोण तर तो गुणरत्न सदावर्ते आहे असा आरोप पोलिसांनी केला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी सांगितले की, साडे १० वाजताचे चॅट आहेत. यानंतर ते ११.२९ पर्यंत ते फोन करुन माध्यमांना हल्ल्याच्याबाबत माहिती देत होते. यांनंतर त्यांनी दुपारी हल्ल्याच्या दिवशी चंद्रकांत सूर्यवंश यांना फोन केला होता. या दोघांमध्ये व्हॉटसअॅप कॉल झाले होते याचा तपास पोलिसांनी माहिती घेतली आहे. तसेच नागपूरमधील एका व्यक्तीचे नाव सध्या आम्ही सांगणार नाही असे पोलिसांनी सांगितले आहे.

तसेच आंदोलनादरम्यान सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून ५५० रुपये घेतले आहेत असा आरोप पोलिसांनी केला आहे. सदावर्तेंनी दीड कोटी रुपये गोळा केले आहेत. या पैशाचे काय केले याचा तपास करायचा आहे. कोणाला कोणाला पैसे दिले याची माहिती घ्यायची असल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले आहे.

- Advertisement -

माध्यमांना देखील चौकशीला बोलवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ३१ मार्चपर्यंत वापरण्यात आलेले सीमकार्ड आणि फोन मिळाले नाही याचा तपास करायचा आहे. याशिवाय नागपूरमध्ये व्हॉट्सअॅप कॉल करण्यात आलेले आहेत. हल्ल्याच्या दिवशी सकाळी साडे अकरानंतर नागपूरमध्ये फोन करण्यात आला होता. याचा तपास अद्याप झाला नाही. ११.३५ मिनिटांनी एक कॉल करण्यात आला, तसेच दुपारी १.३८ वाजता नागपूरवरुन सांगण्यात आले की, पत्रकार पाठवा असा दावा पोलिसांनी कोर्टात केला आहे.

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बारामतीचा उल्लेख

बारामतीला काही होईल असे सदावर्तेंनी भ्रमित करण्यासाठी वक्तव्य केले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बारामतीचा उल्लेख केला. कारण पोलिसांचे पूर्ण लक्ष हे बारामतीवर असेल आणि मुंबईत आंदोलन करण्यात येईल असा यामागचा हेतू होता. हा कट सदावर्ते यांनी रचला असून ते मुख्य सूत्रधार आहेत. ९ एप्रिललाच हल्ल्याचा प्लान होता. याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली. या हल्ल्यात आपला सहभाग नाही असे दाखवण्यासाठी सदावर्ते आंदोलनात आणि आझाद मैदानात उपस्थित न राहता कोर्टात जाऊन बसले. कारण पोलिसांना वाटावे की, ते या आंदोलनात सहभागी नाहीत असा दावा असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : ठाण्याच्या सभेला ये, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो; राज ठाकरेंचा वसंत मोरेंना आदेश

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -