घरमहाराष्ट्रRaosaheb Kasbe : मराठा आरक्षणामध्ये घातलेला खुट्टा जरांगेंना...; भुजबळांसमोर साहित्यिकाचे वक्तव्य

Raosaheb Kasbe : मराठा आरक्षणामध्ये घातलेला खुट्टा जरांगेंना…; भुजबळांसमोर साहित्यिकाचे वक्तव्य

Subscribe

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन झाल्यानंतर राज्य सरकारने आरक्षणाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग गठीत करून आयोगामार्फत खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण केले. या आयोगाने मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा अहवाल दिला. त्यानुसार 20 फेब्रुवारीला झालेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देणारे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. अशातच आता साहित्यिक रावसाहेब कसबे यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. (Raosaheb Kasbe Manoj Jarang could not remove his foot stuck in Maratha reservation Writers statement before Chhagan Bhujbal)

हेही वाचा – Electoral Bond : महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्षाला मिळाले नाही निवडणूक रोखे

- Advertisement -

मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवली सराटी या गावात आंदोलनाला सुरूवात केली. यानंतर त्यांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठ्यांचा समावेश ओबीसीमध्ये करून त्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यावे, अशी मागणी केली होती. याचवेळी त्यांनी एका भाषणात बोलताना ‘मराठा आरक्षणामध्ये घातलेला खुट्टा मी उपटणारच’ असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा दाखल देत रावसाहेब कसबे यांनी मनोज जरागेंवर निशाणा साधला आहे.

रावसाहेब कसबे म्हणाले की, 2010 च्या दशकात ज्यावेळी ओबीसी आरक्षण पूर्ण धोक्यात आलं होतं, मराठे ओबीसीमध्ये जाणार होते. त्यावेळी सेटींग झालं होतं, बहुमत झालं होतं. छगन भुजबळ यांना हे सगळं माहीत आहे. मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश होणार हे तेव्हा ठरलं होतं. मात्र त्यावेळी मी या गोष्टीला कडाडून विरोध केला. त्यानंतर एकमताने आम्ही मराठ्याना बाहेर काढलं. त्यानंतर जरागेंनी दुसरं आंदोलन सुरू केलं होतं. त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात म्हटले होते की, मराठा आरक्षणामध्ये रावसाहेब कसबेंनी घातलेला खुट्टा तो उपटणार? पण जरांगेनी काय केलं? असा प्रश्न रावसाहेब कसबे यांनी विचारला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Eknath Shinde : राज ठाकरेंचा महायुतीत सहभाग? मुख्यमंत्री म्हणतात, योग्यवेळी योग्य निर्णय…

छगन भुजबळ काय म्हणाले?

दरम्यान, रविवारी सायंकाळी नाशिकच्या औरंगाबादकर सभागृहात आयोजित माळी समाज सेवा समिती आयोजित फुलला माळ्यांचा मळा या डॉक्टर कैलास कमोद लिखित पुस्तकाचे प्रकाशन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाषणात बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मी सध्या ओबीसीसाठी लढतो आहे, पण या लढ्यात फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होत आहे. विकास बाजूला राहतो आहे आणि जात बघितली जात आहे. 2014 साली नाशिक लोकसभा निवडणुकीत मी केलेली विकासकामे बाजूला राहिली आणि आता जात आडवी येत आहे. ज्यांचे काहीच कर्तृत्व नाही ते जातीवर मतदान मागतात, असा टोलाही छगन भुजबळ यांनी हेमंत गोडसे यांचे नाव न घेता लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -