घरमहाराष्ट्रझोपडपट्टी पुनर्वसन समितीतून रवींद्र वायकरांचे नाव काढले; उद्धव ठाकरे गटाचे आमदार बेदखल

झोपडपट्टी पुनर्वसन समितीतून रवींद्र वायकरांचे नाव काढले; उद्धव ठाकरे गटाचे आमदार बेदखल

Subscribe

झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीतून उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांचे नाव वगळण्यात आले आहे

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीतून उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांचे नाव वगळण्यात आले आहे. यापूर्वी आरे वसाहतीच्या संदर्भात स्थापन केलेल्या समितीत वायकर यांना स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारला उद्धव ठाकरे गटाबद्दल आकस असल्याची चर्चा आहे.(Ravindra Waikar named in Slum Rehabilitation Committee; MLAs of Uddhav Thackeray group evicted)

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाबाबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या उत्तरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जागेवरील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाच्या अडचणीच्या संदर्भात चौकशी करून उपाययोजना करण्याबाबत विधिमंडळ सदस्यांची समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पात्र झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी राज्याच्या महसूल आणि वन विभागाच्यावतीने 12 लोकप्रतिनिधींची समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये आशीष शेलार, प्रवीण दरेकर, अतुल भातखळखर, प्रकाश सुर्वे, अमित साटम, सुनील प्रभू, मनीषा चौधऱी, महादेव जानकर, सुनील राणे, मिहीर कोटेचा आणि राजसंहसिंह यांचा समावेश आहे. या समितीत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू या एकमेव आमदाराला स्थान मिळाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : पवार काका – पुतण्यांची पुण्यात बड्या उद्योगपतीच्या बंगल्यावर गुप्त भेट; चर्चा मात्र गुलदस्त्यात

पत्र लिहल्यानंतर आरे दुग्ध वसाहतीच्या समितीत

सुनील प्रभू यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नांवर सभागृहात वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्याचवेळी आमदार रवींद्र वायकर यांनीही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नाला वेळोवेळी वाचा फोडली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या आरे काँलनीतील रहिवाशांच्या प्रश्नांपासून, पुनर्वसन रस्ते, मुलभूत सुविधा अशा विविध विषयांवर वायकर यांनी सभागृहात आवाज उठवला आहे. पण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसनाच्या प्रश्नावर स्थापन केलेल्या समितीतून रवींद्र वायकर यांचे नाव वगळले आहे. यापूर्वी आरे दुग्ध वसाहतीच्या सर्वंकष विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमधूनही वायकर यांचे नाव यांचे नाव वगळण्यात आले होते. पण स्वतः वायकर यांनी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहिल्यानंतर रवींद्र वायकर यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा : ‘तुम्ही परत याल तर पंतप्रधान बनूनच या’; राहुल गांधींना ‘कोणत्या’ गावातील लोकांनी म्हटले असे,वाचा-

माझ्या नावाची अँलर्जी-वायकर

या संदर्भात रवींद्र वायकर यांच्याशी संपर्क साधला असता, या सरकारला शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा आमदार म्हणून माझ्या नावाची अँलर्जी आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी संबंध नसलेल्यांची या समितीमध्ये वर्णी लागली आहे. पण माझ्या मतदारसंघातील आरे वन क्षेत्राचा भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी संबंधित असूनही समितीतून माझे नाव वगळले आहे. हा लोकप्रतिनिधीचा अपमान आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -