घरमहाराष्ट्रपीएमसी बँक प्रकरणी आरबीआय ३० ऑक्टोबरला निर्णय घेणार; खातेदारांचे आंदोलन स्थगित

पीएमसी बँक प्रकरणी आरबीआय ३० ऑक्टोबरला निर्णय घेणार; खातेदारांचे आंदोलन स्थगित

Subscribe

पीएमसी घोटाळ्याप्रकरणी आरबीआय ३० ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन निर्णय देणार असल्याचे आरबीआयच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

पीएमसी ग्राहकांचे शिष्टमंडळ आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) अधिकारी यांच्यात मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पीएमसी घोटाळ्याप्रकरणी आरबीआय ३० ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन निर्णय देणार असल्याचे आरबीआयच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजेपासून मुंबईतल्या आझाद मैदानावर पीएमसी खातेदारांचे आंदोलन सुरु होते. आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मात्र, ३० ऑक्टोबरला पुन्हा हे आंदोलन छेडण्यात येईल, असे खातेदारांनी म्हटले आहे. दरम्यान, पीएमसी खातेदारांकडून सुरु असलेल्या या आंदोलनात जवळपास १०० खातेदार सहभागी झाले होते.

हेही वाचा – मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचं खातं उघडणार? अणुशक्ती नगरात ९ टक्क्यांनी मतदान वाढलं!

- Advertisement -

काय आहे नेमके प्रकरण?

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी आरबीआयने पीएमसी बँकवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. त्यामुळे शेकडो पीएमसी खातेदारांचे कोट्यवधी रुपये बँकेत अडकले आहेत. आपले पैसे मिळावे म्हणून खातेदार बरेच प्रयत्न करत आहेत. याशिवाय पीएमसी खातेदारांना पैसे मिळावे यासाठी आरबीआयने लवकर महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन खातेदारांना त्यांचे हक्काचे पैसे मिळवून द्यावे, असे अनेक खातेदारांचे मत आहे. मात्र, पीएमसीकडून ठोसपणे निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप काही खातेदारांकडून करण्यात येत आहे. याशिवाय पीएमसी बँकेच्या खातेदारांना आरबीआयकडून उडवाउडवीचे उत्तरे दिले जात असल्याचे खातेदारांनी सांगितले आहे. पीएमसी खातेदारांचे मुंबईतल्या आझाद मैदानावर आज सकाळपासून आंदोलन सुरु होते. त्यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाचे आरबीआयच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत येत्या ३० ऑक्टोबरला आरबीआयला पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडेल, असे आरबीआयच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – पी. चिदंबरम यांना अखेर दिलासा, एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर!

- Advertisement -

२५ ऑक्टोबर आणि २७ ऑक्टोबरला आरबीआयची महत्त्वपूर्ण बैठक

पीएमसी बँक संदर्भात आरबीआयची २५ ऑक्टोबर आणि २७ ऑक्टोबरला महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत आरबीआय संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत. त्यानंतर ३० ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन आरबीआय आपला निर्णय जाहीर करेल, असे आरबीआयच्या अधिकाऱ्यांकडून पीएमसी खातेधारांच्या शिष्टमंडळाला सांगण्यात आले. दरम्यान, आज स्थगित करण्यात आलेले आंदोलन ३० ऑक्टोबरला पुन्हा सुरु करण्यात येईल, असे खातेदारांकडून सांगण्यात आले आहे. ३० ऑक्टोबरला सकाळी १० वाजता सर्व खातेदार सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर उपस्थित राहून पुन्हा आंदोलन पुकारणार असल्याचे खातेदारांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -