घरमुंबईमाहीममध्ये मनसेच्या संदीप देशपांडेंचा पेपर अवघडच!

माहीममध्ये मनसेच्या संदीप देशपांडेंचा पेपर अवघडच!

Subscribe

माहीम विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी यंदा घटली आहे. त्यामुळे संदीप देशपांडेंसाठी इथला विजय कठीण झाला आहे.

विधानसभेच्या २८८ जागांसाठी सोमवारी राज्यभरात मतदान झालं. यावेली दीड हजाराहून जास्त उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं. राज्यभरात झालेल्या मतदानाची टक्केवारी संध्याकाळी ६ वाजता हाती आली. त्यानुसार राज्यभरात २०१४च्या तुलनेत मतदान घटल्याचं स्पष्ट झालं. २०१४मध्ये राज्यात ६३ टक्क्यांच्या आसपास असलेलं मतदान २०१९मध्ये ६० टक्क्यांवर अडकलं. हाच कित्ता मुंबईच्या मतदानामध्ये देखील आढळून आला. २०१४मध्ये मुंबईत ५१.१९ टक्के मतदान झालं होतं. २०१९मध्ये हाच आकडा ४९.९० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. असंच काहीसं चित्र मुंबईतल्या ३६ पैकी २१ मतदारसंघांमध्ये दिसून आलं. आणि त्यातलाच चर्चेत राहिलेल्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे दादरजवळचा माहीम मतदारसंघ!

राज ठाकरेंच्या सभेचाही फायदा नाही?

माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्यासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांचं आव्हान होतं. यंदा राज ठाकरेंनी राज्यभरात घेतलेल्या १८ सभांपैकी एक सभा त्यांनी माहीममध्ये देखील घेतली होती. विरोधी पक्ष म्हणून मनसेला संधी द्या, अशी मागणी करणारी राज ठाकरेंची भाषणं मतदानात फरक पाडतील, असं देखील म्हटलं गेलं. मात्र, मतदानात त्या अनुषंगाने टक्केवारी वाढलेली काही दिसली नाही.

- Advertisement -

वाचा माहीममधील राजकीय गणितं!

अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर निष्प्रभ?

दादर आणि आसपासच्या परिसरामध्ये वाढलेल्या फेरीवाल्यांच्या प्रश्नावर अद्याप तोडगा निघू न शकल्यामुळे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात लोकांमध्ये नाराजी होती. तसेच, सदा सरवणकर यांचा एका महिलेवर हात उचलल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. मात्र, त्याचा फारसा परिणाम झाल्याचं मतांच्या टक्केवारीवरून तरी दिसत नाही. २०१४मध्ये सदा सरवणकर यांनी अवघा ६ हजार मतांनी विजय मिळवला होता. तेव्हा मतांची टक्केवारी होती ५१ टक्के. मात्र, यंदा हीच टक्केवारी वाढण्याऐवजी कमीच झाली आहे. त्यामुळे सदा सरवणकर यांच्याविरोधात मतदान झालं नसल्याचंच दिसत आहे. त्यामुळे संदीप देशपांडेंसाठी माहीमचा पेपर आता अवघडच असल्याचं बोललं जात आहे.


हेही वाचा – राम कदमांच्या घाटकोपर पश्चिममध्ये वेगळा निकाल लागण्याची शक्यता!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -