घरमहाराष्ट्रगणेशोत्सवामध्ये पोलिसांना मदत करण्यासाठी गणेश मंडळांकडून गणसेवक नियुक्ती

गणेशोत्सवामध्ये पोलिसांना मदत करण्यासाठी गणेश मंडळांकडून गणसेवक नियुक्ती

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रात गणेशोत्सव हा खूप मोठा सण मानला जातो. राज्यातील गणेशोत्सव पाहाण्यासाठी जगभरातून लाखोच्या संख्येने गणेशभक्त मुंबईत येतात. यामुळे दहा दिवस सुरू असलेल्या गणेशोत्सवादरम्यान पोलिसांवर मोठा ताण येतो. या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव काळात पोलिसांना मदत करण्यासाठी मुंबईच्या प्रत्येक गणेश मंडळांमध्ये गणसेवक नियुक्त करण्यात येणार आहेत. यामुळे उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्यक समितीसोबत झालेल्या बैठकीमध्ये निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवच्या काळात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अधिक सज्ज राहण्यासाठी मुंबई पोलिसांकडे हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. आणि या उपक्रमाची पोलिसांनी प्रतिसाद दिला आहे. यानुसार गणेशोत्सव मंडलातील 10 आणि गणेशोत्सव मंडळातील 20 असे एकूण एक लाख गणसेवक काम करणार आहेत. हे सर्व गणसेवक पोलिसांशी वेळोवेळी समन्वय साधतील.

- Advertisement -

हेही वाचा – जीवाला तुझी आस गा लागली… बंधन दूर होताच गणेशमूर्तीने घेतले विराट रूप

एक लाख गणसेवक पोलिसांच्या मदतीला

गणेशोत्सव काळात गणेशभक्तांसह सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये. पोलीस आणि गणेश मंडलाच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण मुंबईसह उपनगरात लहान-मोठे असे हजारो मंडळे आहेत. या मंडळात हजारो गणेशभक्त बाप्पाच्या दर्शनासाठी येतात आणि लाडक्या बाप्पाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्त मोठ्या संख्येने गर्दी करतात. या पार्श्वभूमीसाठी एक लाख गणसेवक पोलिसांच्या मदतीला असणार आहे.

- Advertisement -

पोलीस गणसेवकांना देणार ओळखपत्र

गणेश मंडळाकडून नियुक्त करण्यात आलेल्या गणसेवकांना पोलिसांकडून ओळखपत्र देखील देण्यात येते. या एक लाक गणसेवक त्यांच्या मंडळाच्या मंडप आणि परिसरात नजर ठेवणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -