घर क्राइम मित्रच ठरला मित्राचा कर्दनकाळ, खून केल्यानंतर अॅसिड टाकून पुरावा नष्ट करण्याचा क्रूर...

मित्रच ठरला मित्राचा कर्दनकाळ, खून केल्यानंतर अॅसिड टाकून पुरावा नष्ट करण्याचा क्रूर प्रयत्न

Subscribe

नाशिक : किरकोळ वादातुन 41 वर्षीय व्यक्तीचा त्याच्या मित्रांनीच धारदार हत्याराने खून केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने ज्वलनशील पदार्थाचा वापर करण्याचा क्रूर प्रकारही संशयितांनी केलाय. याप्रकरणी दोन संशयितांच्या विरोधात दिंडोरी तालुक्यातील वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप हरी मेधणे (रा.खेडले, ता.दिंडोरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (A 41-year-old man was killed by his friends with a sharp weapon due to a petty dispute)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हरी मेधणे याच्या घरी किरण शरद कदम (रा.कोर्हाटे) व त्याचा मित्र आले. दोघांनी किरकोळ कारणावरुन मेधणे यांच्याशी वाद घातला. दोघे मेधने यांना घराबाहेर घेऊन गेले. 11 सप्टेंबर रोजी रात्री 8 ते 11 वाजेच्या सुमारास मेधणे यांच्या घराजवळील चिंचेच्या झाडाखाली मेधणे यांच्यावर किरण कदम व त्याचा मित्र या दोघांनी संगनमत करुन धारदार हत्याराने वार केले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मेधणे याच्या शरीरावर ज्वलनशील पदार्थ टाकला, असे संदीप मेधणे यांच्या आई रंभाबाई हरी मेधणे यांनी वणी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय अधिकारी संजय बामळे, सहायक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. फिर्यादीनुसार दोन संशयितांविरोधात खुनाचा व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -